‘सर्वांसाठी घर’ चा मोजक्या लोकांना फायदा, राज्यसभेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:57 IST2021-02-05T15:56:41+5:302021-02-05T15:57:19+5:30
Home News : केंद्र सरकारची २०२२ पर्यंत घरांसाठीची ग्रामीण भागातील गरीब घटकांसाठी गृह कर्ज व्याज अनुदान योजनेचा फायदा मोजक्याच लाभार्थींना झाला. या योजनेत सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांचा समावेश नसल्याने योजनेचा लाभ कमी लोकांपर्यंत पोहोचत आहे

‘सर्वांसाठी घर’ चा मोजक्या लोकांना फायदा, राज्यसभेत माहिती
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : केंद्र सरकारची २०२२ पर्यंत घरांसाठीची ग्रामीण भागातील गरीब घटकांसाठी गृह कर्ज व्याज अनुदान योजनेचा फायदा मोजक्याच लाभार्थींना झाला. या योजनेत सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांचा समावेश नसल्याने योजनेचा लाभ कमी लोकांपर्यंत पोहोचत आहे, हे सरकारनेही मान्य केले आहे. मागील दोन वर्षांत महाराष्ट्रातील १,४६६ ग्रामस्थांसह देशभरातून ६,०७४ गावकरीच या योजनेत सहभाग होऊ शकले.
ग्रामीण विकास, कृषी आणि शेतकरी कल्याण व पंचायतराजमंत्री नरेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सांगितले की, महाराष्ट्रातून योजनेत सहभागी झालेल्या लोकांना ४.१९ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला. मागील दोन वर्षांत या योजनेतहत १२.२१ कोटी रुपयांची सबसिडी देण्यात आला. २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर यासाठी सुरू करण्यात आलेल्या ग्रामीण गृह कर्ज अनुदान योजनेसाठी कमी लोक अर्ज करीत आहेत. एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा, युको बँक, इंडियन बँकसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा योजनेत समावेश करण्यासाठी समझौता केलेला नाही. कर्ज घेणारे बँकेला हमी देऊ शकत नाहीत. त्यामुळे बँका त्यांचे कर्ज मंजूर करीत नाहीत.