अमरिंदर सिंग यांच्या पक्षाला हॉकी स्टिकचे चिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 07:19 IST2022-01-12T07:18:59+5:302022-01-12T07:19:25+5:30
अमरिंदर सिंग राज्यातील ही निवडणूक भाजपसोबत युती करून लढवत आहेत.

अमरिंदर सिंग यांच्या पक्षाला हॉकी स्टिकचे चिन्ह
- बलवंत तक्षक
चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता देत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिन्ह म्हणून हॉकी स्टिक आणि बॉल दिला आहे. हे चिन्ह मिळाल्यावर सिंग म्हणाले की,“आता फक्त गोल करणेच शिल्लक आहे.”
अमरिंदर सिंग राज्यातील ही निवडणूक भाजपसोबत युती करून लढवत आहेत. अजून या पक्षात जागांचे वाटप झालेले नाही. सिंग यांनी पुन्हा एकदा म्हटले की, “ पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना विधानसभेत जाऊ देणार नाही.” राज्यात ११७ जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.