HMPV Virus : "HMPV व्हायरसमुळे पॅनिक होऊ नका, पण..."; एक्सपर्टनी सांगितला प्रोटोकॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:02 IST2025-01-06T16:02:09+5:302025-01-06T16:02:35+5:30

HMPV Virus : भारतात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) संदर्भात रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य मंत्रालय तसेच सर्व एक्सपर्ट अलर्ट झाले आहेत.

hmpv virus spreading in china doctor said no need to panic but caution is also necessary | HMPV Virus : "HMPV व्हायरसमुळे पॅनिक होऊ नका, पण..."; एक्सपर्टनी सांगितला प्रोटोकॉल

HMPV Virus : "HMPV व्हायरसमुळे पॅनिक होऊ नका, पण..."; एक्सपर्टनी सांगितला प्रोटोकॉल

भारतात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) संदर्भात रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य मंत्रालय तसेच सर्व एक्सपर्ट अलर्ट झाले आहेत. या व्हायरसशी संबंधित रुग्णांवर आता विशेष लक्ष ठेवलं जात आहे. यावर दिल्ली मेडिकल काऊंन्सिलचे अध्यक्ष आणि सीनियर पीडियाट्रिशियन डॉ अरुण गुप्ता म्हणाले की, भारतात एचएमपीव्ही व्हायरसचे जे रुग्ण समोर येत आहेत त्यावरून काळजी करण्याची आणि पॅनिक होण्याची गरज नाही., 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या व्हायरसमुळे होणारं संक्रमण याआधीही झालं आहेत आणि याआधीही अशी प्रकरणं नोंदवली गेली आहेत. भारतात, ही प्रकरणे नियमित निरीक्षणादरम्यान आढळून आली आहेत. तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की, फ्लू सारखी लक्षणं असलेल्या रोगांच्या प्रकरणांमध्ये कोणतीही अनपेक्षित वाढ होत नाही, त्यामुळे अशी काळजी करण्याची गरज नाही असं म्हणता येईल. 

डॉक्टरांचं म्हणणं आहे की, कोरोनामध्ये ज्याप्रकारे खबरदारी घेण्यात आली होती, तशी काही खबरदारी अजूनही घेतली जाऊ शकते, जसं की मास्क घालणे, शिंकताना नाकावर रुमाल ठेवणे, हात स्वच्छ धुणं आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहणे. एचएमव्हीपी (ह्युमन मेटाप्युमोव्हायरस) संदर्भात आरोग्य मंत्रालयाने शनिवारी बैठक घेतली. HMPV व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

चिंताजनक! श्वास घेण्यास त्रास... 'ही' आहेत HMPV व्हायरसची लक्षणं; 'या' लोकांना मोठा धोका

चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या HMPV व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जगाचं टेन्शन वाढलं आहे. चायना डिसीज कंट्रोल ऑथॉरिटीने गेल्या महिन्याच्या अखेरीस याबाबत एक रिपोर्ट जारी केला आणि सांगितलं की, देशात एक विचित्र प्रकारचा न्यूमोनिया पसरत आहे, ज्याची कारणं अज्ञात आहेत. 

या व्हायरसची लक्षणं कोरोनासारखीच आहेत. या आजाराने ग्रस्त व्यक्तीला जास्त ताप, सर्दी आणि खोकला, नाक बंद होणं किंवा नाक गळणं, घसा खवखवणं, थकवा आणि अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत दुखणं, न्यूमोनिया, ब्रॉन्कायलाइटिस सारखी लक्षणं दिसतात. मुलांमध्ये या आजाराच्या थोडी वेगळी लक्षणं दिसतात. त्यांना अन्न गिळण्यास त्रास होतो, मूड बदलतो, चिडचिड होते आणि नीट झोप लागत नाही. 
 

Web Title: hmpv virus spreading in china doctor said no need to panic but caution is also necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.