शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

"HMPV  नवीन नाही, घाबरू नका, पण...", आरोग्य तज्ज्ञांनी दिली मोठी अपडेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 11:28 IST

HMPV virus : डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की, २०२५ मध्ये चीनमध्ये HMPV हा व्हायरस पसरलेला आहे. परंतू हा व्हायरस फारसा नवीन नाही. या व्हायरसची साथ काही काळापूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी अमेरिका, कॅनडा आणि इतर देशातही आली होती.

HMPV virus : चीनमध्ये पसरलेल्या ह्यूमन मेटाप्न्यूमो व्हायरसने (HMPV) जगभरातील चिंता वाढवली आहे. या व्हायरसमुळे चीनमध्ये हाहाकार उडाला असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या व्हायरसबाबत भारतातही चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनचे (महाराष्ट्र) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केले की, चीनमधील HMPV मुळे घाबरण्याची गरज नाही. हा व्हायरस नवीन नाही. सध्या भारतात याचे रुग्ण आढळले नाही. पण, आपण याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 

('लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की, २०२५ मध्ये चीनमध्ये HMPV हा व्हायरस पसरलेला आहे. परंतू हा व्हायरस फारसा नवीन नाही. या व्हायरसची साथ काही काळापूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी अमेरिका, कॅनडा आणि इतर देशातही आली होती. हा व्हायरस कोविड सारखाच असला, तरी कोविडच्याच गटातील नाही. या आजाराचा लोकांना जो काही त्रास होतो. तो कोविड पेक्षा कमी आहे. तसेच, या व्हायरसचा मृत्यूदरही खूप कमी आहे. 

कोविडचा जो गट होता. त्यापेक्षा  HMPV हा वेगळा आहे. हा Pneumoviridae मधील एका वेगळा गटातील आहे. जो आरएसबी गटातील व्हायरस आहे. याची बाधा झाल्यानतंर संबंधीत व्यक्तीला नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे, खोकला येणे, घसा खवखवणे, ताप येणे, तसेच, हा आजार वाढला तर न्युमोनिया होण्यासारखी लक्षणं दिसून येतात. याशिवाय, ऑक्सिजनची लेव्हल सुद्धा कमी होऊ शकतो. मात्र,  HMPV हा तितका धोकादायक नाही, असे डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

याचबरोबर, साधारणता पाच ते दहा दिवसांत  HMPV हा आजार पूर्णपणे बरा होतो. विश्रांती आणि इतर काही तापाची औषधे घेतल्यास हा आजार बरा होतो. भारतात  HMPV चे रुग्ण अजूनही आढलेले नाहीत. परंतु कोविड सारखी या आजाराची साथ वाढू शकते, अशी अनेक देशांना भीती वाटत आहे. दरम्यान, या आजारावर अजूनही कोणतही औषध नाही. मात्र, साथ वाढली तर यावरही लस येईल. तसेच, या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय कोरोनासारखेच आहेत. म्हणजेच मास्क घालणे, गर्दीमध्ये न जाणे, सामाजिक अंतर राखणे, हात धुणे हेच प्रतिबंधात्मक उपाय आहेत. सध्या भारतात याचे रुग्ण आढळले नाहीत. मात्र आपण याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असेही डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले.

भारतात पहिला रुग्ण आढळलाचीनमध्ये ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरसमुळे (HMPV) हाहाकार उडाला आहे. या व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. अशात चीनमधील हा व्हायरस भारतातही पोहोचला आहे. या व्हायरसचा पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये आढळला आहे. बंगळुरू येथील एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV व्हायरस आढळून आला आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाने म्हटले आहे की, आम्ही आमच्या लॅबमध्ये याची चाचणी केलेली नाही. मात्र, या प्रकरणाचा अहवाल एका खासगी रुग्णालयात आला आहे. खासगी रुग्णालयाच्या या अहवालावर शंका घेण्याचे कारण नाही.

HMPV  म्हणजे काय?ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो आणि हिवाळ्यामध्ये हे सर्वात सामान्य आहे.

टॅग्स :HMPV Virusह्युमन मेटापन्यूमोव्हायरसHealthआरोग्यchinaचीनIndiaभारत