शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

HMPV Virus : आसाममध्ये HMPV व्हायरसची एन्ट्री, १० महिन्यांच्या मुलाला संसर्ग; देशात एकूण किती रुग्ण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:42 IST

HMPV Virus : एका १० महिन्यांच्या मुलाला HMPV व्हायरसची लागण झाली आहे.

देशात HMPV व्हायरसची प्रकरणं सतत नोंदवली जात आहेत. याच दरम्यान, आसाममध्येही एक प्रकरण समोर आले आहे. लखीमपूरमध्ये, एका १० महिन्यांच्या मुलाला HMPV व्हायरसची लागण झाली आहे. सध्या मुलाला दिब्रुगडमधील आसाम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, मुलाची प्रकृती स्थिर आहे आणि काळजी करण्यासारखं काहीही नाही.

आसाममधील या प्रकरणासह, देशात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) प्रकरणांची एकूण संख्या १५ वर पोहोचली आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक ४ प्रकरणे आहेत. शुक्रवारी राजस्थान आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला. यापूर्वी गुरुवारी ३ प्रकरणे नोंदवली गेली होती. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस (HMPV) मुळे चीनमध्ये या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. अलिकडच्या काळात रुग्णसंख्येत वाढ झाल्याच्या वृत्तांमुळे, सिक्कीम सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी एक सूचना जारी केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्य सचिवांनी अलीकडेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागासोबत सध्याच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी आणि राज्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. 

या बैठकीत व्हायरसचे विविध पैलू आणि त्याच्या संसर्गाची पद्धत तसेच संसर्ग झाल्यावर उद्भवणाऱ्या लक्षणांवर चर्चा करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. साबणाने सतत हात स्वच्छ धुवा, मास्क घाला असा सल्ला देण्यात येत आहे.  

टॅग्स :HMPV Virusह्युमन मेटापन्यूमोव्हायरसAssamआसाम