शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

HMPV virus : चीनमध्ये पसरलेल्या HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला, ८ महिन्यांच्या मुलीला संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 10:20 IST

HMPV First Case in India : HMPV सहसा फक्त लहान मुलांमध्ये आढळतो.

HMPV First Case in India: २०२० मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. चीनमध्ये ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरसमुळे (HMPV) हाहाकार उडाला आहे. या व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. अशात चीनमधील हा व्हायरस भारतातही पोहोचला आहे. या व्हायरसचा पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये आढळला आहे.

बंगळुरू येथील एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV व्हायरस आढळून आला आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाने म्हटले आहे की, आम्ही आमच्या लॅबमध्ये याची चाचणी केलेली नाही. मात्र, या प्रकरणाचा अहवाल एका खासगी रुग्णालयात आला आहे. खासगी रुग्णालयाच्या या अहवालावर शंका घेण्याचे कारण नाही.

('लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान,  HMPV सहसा फक्त लहान मुलांमध्ये आढळतो. सर्व फ्लू नमुन्यांपैकी ०.७ टक्के HMPV चे असतात. तसेच, या व्हायरसचा स्ट्रेन काय आहे? हे अद्याप समजलेले नाही. अशा परिस्थितीत आरोग्य तज्ज्ञांनी या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता आणि सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, लोकांना हात धुणे आणि मास्क वापरण्याचा आणि इतर खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हा व्हायरस नवीन नाही, घाबरू नका -  डॉ. अविनाश भोंडवे HMPV व्हायरस नवीन नाही, घाबरू नका, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे (महाराष्ट्र) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी नागरिकांना केले आहे. तसेच, श्वसनसंस्थेच्या या आजारात सर्दी, खोकला, ताप येतो, तो शिंका- खोकल्यातूनच पसरतो. पण कोरोना इतका तो घातक नाही. २००१ मध्येच त्याला विलग करून त्याचा अभ्यास झालेला आहे. चीन, जपान, अमेरिका, कॅनडामध्ये याचे रुग्ण पूर्वीपासून आढळत आहेत. भारतात याने बाधित रुग्ण आढळले नाहीत, असेही  डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

HMPV व्हायरस म्हणजे काय?ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो आणि हिवाळ्यामध्ये हे सर्वात सामान्य आहे.

टॅग्स :Healthआरोग्यBengaluruबेंगळूरIndiaभारतchinaचीनHMPV Virusह्युमन मेटापन्यूमोव्हायरस