दिल्लीत हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड कमांडर ताब्यात; अनेक कारवायांमध्ये सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 18:02 IST2024-01-04T18:01:13+5:302024-01-04T18:02:03+5:30

या दहशतवाद्यावर 10 लाखांचे बक्षीस होते.

Hizbul Mujahideen's most wanted commander detained in Delhi; Involved in many activities | दिल्लीत हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड कमांडर ताब्यात; अनेक कारवायांमध्ये सामील

दिल्लीत हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड कमांडर ताब्यात; अनेक कारवायांमध्ये सामील


नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतदहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी घटनांमध्ये तो वॉन्टेड होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना घडवून तो भूमिगत झाला होता. गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या दहशतवाद्याला अटक केली. हा दहशतवादी हिजबुलचा कमांडर जावेद अहमद मट्टू असल्याचे समोर आले आहे. सोपोरचा रहिवासी असलेला मट्टू पाकिस्तानात जाऊन आला आहे.
 

Web Title: Hizbul Mujahideen's most wanted commander detained in Delhi; Involved in many activities