शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

गर्भवती महिलेला दिलं HIV संक्रमित रक्त, ब्लड बँकेचे 3 कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 1:42 PM

तामिळनाडूमध्ये गर्भवती महिलेला HIV संक्रमित रक्त चढवल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देतामिळनाडूमध्ये गर्भवती महिलेला HIV संक्रमित रक्त चढवल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तामिळनाडूतल्या शिवकाशीतल्या सत्तुर सरकारी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या 24 वर्षीय गर्भवती महिलेला HIV संक्रमित रक्त चढवण्यात आलं.

चेन्नई- तामिळनाडूमध्ये गर्भवती महिलेला HIV संक्रमित रक्त चढवल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तामिळनाडूतल्या शिवकाशीतल्या सत्तुर सरकारी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या 24 वर्षीय गर्भवती महिलेला HIV संक्रमित रक्त चढवण्यात आलं. जेव्हा महिला वारंवार आजारी पडू लागली, तेव्हा ही घटना उघडकीस आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले असून, त्यांनी ब्लड बँकेच्या तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं आहे.30 नोव्हेंबर रोजी HIV संक्रमित व्यक्तीचं रक्त घेण्यात आलं होतं. त्यानं परदेशात जाण्यापूर्वी खासगी रुग्णालयातून रक्ताची चाचणी केली होती. ज्यात तो HIV संक्रमित असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यानं पुन्हा शिवकाशीतल्या सरकारी रुग्णालयात रक्ताची तपासणी केली, त्यावेळीही तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या काही दिवसांनंतर 3 डिसेंबरला एक गर्भवती महिलेला अॅनिमिया झाल्यानं उपचारासाठी तिला शिवकाशीतल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या महिलेची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला रक्त चढवण्याचा सल्ला दिला. त्यावेळीच तिला HIV संक्रमित रक्त चढवण्यात आलं.या घटनेच्या काही दिवसांनंतर महिला वारंवार आजारी पडू लागली. जेव्हा तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळली. सध्या महिलेचं समुपदेशन सुरू असून, तिला HIVपासून वाचवण्यासाठी अँटी रेट्रोवायरलवर ठेवण्यात आलं आहे.  या प्रकारानंतर जिल्हा वैद्यकीय उपसंचालक मनोहरन यांनी 10 सरकारी ब्लड बँक आणि 4 खासगी ब्लड बँकेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या तरी तपासणी सुरू असून, अजून कोणाला HIV संक्रमित रक्त चढवण्यात आलं तर नाही ना, याचा रुग्णालय प्रशासन तपास करत आहे. 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीHIV-AIDSएड्सTamilnaduतामिळनाडू