हिट अँड रन, घराबाहेर रांगोळी काढत असलेल्या मुलींना भरधाव कारने चिरडले, अल्पवयीन ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 15:38 IST2024-10-29T15:37:47+5:302024-10-29T15:38:13+5:30
Hit And Run Case in Indore: देशभरात दिवाळीच्या सणाला उत्साहात सुरुवात होत असतानामध्य प्रदेशमधील इंदूर शहरामध्ये हिट अँड रनची एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे आपल्या घराबाहेर अंगणात रांगोळी काढत असलेल्या मुलींना भरधाव कारने चिरडले.

हिट अँड रन, घराबाहेर रांगोळी काढत असलेल्या मुलींना भरधाव कारने चिरडले, अल्पवयीन ताब्यात
देशभरात दिवाळीच्या सणाला उत्साहात सुरुवात होत असतानामध्य प्रदेशमधील इंदूर शहरामध्ये हिट अँड रनची एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे आपल्या घराबाहेर अंगणात रांगोळी काढत असलेल्या मुलींना भरधाव कारने चिरडले. त्यामध्ये एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी १७ वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
याबाबत डीसीपी विनोद कुमार मीणा यांनी सांगितले की, ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. या पीडितांची ओळख प्रियांशी प्रजापती (२१) आणि नव्या प्रजापती (१४) यांच्या रूपात पटवण्यात आली आहे. त्या दोघीही एरोड्रोम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या त्यांच्या घराबाहेरील अंगणात रांगोळी काढत होत्या तेवढ्यात आलेल्या एका भरधाव कारने त्यांना चिरडले.
दरम्यान, या घटने नंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच त्याचा ताब्यातील कार जप्त करण्यात आली आहे. आता आरोपीविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.