शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'वारंवार खोटं बोलून इतिहास बदलणार नाही', राहुल गांधींचा भाजपच्या त्या' टीकेवर पलटवार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 20:42 IST

भाजपने काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची छाप असल्याची टीका केली.

Rahul Gandhi Attacks BJP: लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकमेकांवरील टीका अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, भाजपने काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची छाप असल्याची टीका केली होती. त्या टीकेला आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

इतिहास साक्षीदार आहे...राहुल गांधी यांनी बुधवारी ट्विटरवर पोस्ट करताना म्हटले की, कोण देशभक्त आहे आणि कोण देशद्रोही, याचा इतिहास साक्षी आहे. यंदाची निवडणूक ही दोन विचारसरणीतील लढाई आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची छाप दिसणाऱ्या भाजपने जाणून घेतले पाहिजे की, विविध राजकीय व्यासपीठांवर वारंवार खोटे बोलून इतिहास बदलला जाणार नाही. एका बाजूला भारताला कायम एकसंध ठेवणारी काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणारी भाजप आहे. 

इंग्रजांच्या विरोधात कोण उभा राहिलादेशाची फाळणी करणाऱ्या शक्तींशी कोणी हातमिळवणी केली आणि देशाच्या एकात्मतेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी कोण लढले, याचा इतिहास साक्षी आहे. भारत छोडो आंदोलनात इंग्रजांच्या विरोधात कोण उभे होते? जेव्हा देशभरातील तुरुंगे काँग्रेस नेत्यांनी भरले जात होते, तेव्हा देशाचे विभाजन करण्यासाठी राज्यांमध्ये चालणाऱ्या सरकारांना कोणत्या शक्तींनी प्रेरित केले? असा सवाल राहुल यांनी विचारला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी