साक्षी महाराज उवाच : विरोधकांचा संघावर पलटवारमेरठ : हिंदू स्त्रियांनो, तुम्ही चार मुलांना जन्म द्या़ त्यातील एक साधू-संन्याशांना द्या व दुसरा देशाच्या सीमेच्या रक्षणाकरिता पाठवा, असे नवे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी येथे केले. विरोधी पक्षांनी या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला असून, सरकारकडे त्याचे स्पष्टीकरण मागण्यासोबतच रा. स्व. संघाच्या नेत्यांनी आधी स्वत:पासून याची सुरुवात करावी, असे भाष्यही केले आहे. साक्षी महाराज येथे एका धार्मिक संमेलनात बोलत होते. मुस्लिमांवर अप्रत्यक्ष रोख ठेवत ते म्हणाले, की आम्ही ‘हम दो, हमारा एक’ ही घोषणा स्वीकारली़ नंतर ‘हम दो और हमारे...’ चाही स्वीकार केला. पण या देशद्रोह्यांचे त्यावर समाधान झाले नाही. मात्र येथे उपस्थित हिंदू स्त्रियांनो, मी तुम्हाला आग्रह करतो, की तुम्ही कमीत कमी चार मुलांना जन्माला घालावे. त्यातील एक साधू -संन्याशांकडे सोपवावा़ दुसरा सीमेच्या रक्षणाकरिता द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. साक्षी महाराजांनी याआधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त असे संबोधून वाद उभा केला होता. त्याकरिता त्यांना संसदेत माफीही मागावी लागली होती. केंद्रीय मंत्री निरांजन ज्योती यांनीही एका रॅलीत असेच वादग्रस्त विधान केले होते. नंतर त्यांना संसदेत माफीही मागावी लागली होती. केंद्रीय मंत्री निरांजन ज्योती यांनीही एका रॅलीत असेच वादग्रस्त विधान केले होते. नंतर त्यांना संसदेत माफीही मागावी लागली होती.या वक्तव्यावर पंतप्रधान, गृहमंत्री, वित्तमंत्री व भाजपाचे अध्यक्ष गप्प का, याचे उत्तर देशला हवे आहे. पण त्यांच्याकडून कोणतेही उत्तर येणार नाही. -अभिषेक मनू सिंघवी, प्रवक्ते, काँग्रेससरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे सर्व नेते यांच्या ‘कथनी’ आणि ‘करनी’मध्ये नेहमीच अंतर असते. त्यांनी स्वत: विवाह करून आधी चार मुलांना जन्म द्यावा व नंतर हिंदूंना तसे करण्यास सांगावे.-के. सी. त्यागी, नेते, जनता दल(यु)
हिंदूंनो, चार मुले जन्माला घाला!
By admin | Updated: January 8, 2015 02:35 IST