शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 9:06 AM

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या महिला नेत्या पूजा पांडेला अटक करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देमहात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणारी हिंदू महासभेची महिला कार्यकर्ता अटकेतपूजा पांडेला पती अशोक पांडेसहीत अटक

नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या महिला नेत्या पूजा पांडेला अटक करण्यात आली आहे. 30 जानेवारीला महात्मा गांधी यांच्या 71 व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात असताना हिंदू महासभेच्या पूजा पांडेने गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या. गांधींच्या हत्येची घटना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न हिंदू महासभेकडून केला गेला. या घटनेविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पूजा पांडेला पती अशोक पांडेसहीत अटक केले आहे. 

उत्तर प्रदेशातील अलीगड येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे.  गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडत यावेळेस नथुराम गोडसेच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण करत मिठाईचे वापट करण्यात आले होते. शिवाय, 'महात्मा नथुराम गोडसे अमर रहे'च्या घोषणाही दिल्या गेल्या. इतकेच नाही तर हिंदू महासभेने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी शौर्य दिवस साजरा केला.  ''महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणणे अयोग्य आहे. जर मी नथुराम गोडसेच्या आधी जन्मले असते, तर मीच महात्मा गांधी यांची हत्या केली असती.''असे संतापजनक वक्तव्यही पूजा  शकून पांडेयने केले होते. 

अटकेच्या कारवाईपूर्वी  पोलिसांनी पूजा पांडेयसहीत 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.  

अखिल भारतीय हिंदू महासभेची वेबसाइट हॅकया घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी  केरला साइबर वॉरिअर्सच्या टीमनं हिंदू महासभेची वेबसाइट हॅक केली होती. लोकांना महात्मा गांधींकडून अहिंसा आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळाली, असा मजकूर हॅकिंग टीमकडून वेबसाइटवर लिहिण्यात आला होता. दरम्यान, हिंदू महासभेची वेबसाइट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. केरळमधील पूरपरिस्थितीवर प्रतिक्रिया देताना हिंदू महासभेचे प्रमुख स्वामी चक्रपाणि यांनी म्हटले होते की, 'जी लोक बीफ खात नाहीत, त्यांनाच मदत केली पाहिजे'. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी हॅकर्सनं हिंदू महासभेची वेबसाइट हॅक केली होती.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी