शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
3
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
4
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
5
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
6
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
7
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
8
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
9
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
10
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
11
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
12
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
13
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
14
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
15
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
16
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
17
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
18
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
19
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
20
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:25 IST

अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील संगडाह उपविभागातील हरिपुरधार येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक खासगी बस खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'जीत कोच' ही खासगी बस कुपवीहून शिमल्याच्या दिशेने जात होती. दुपारी ३ वाजेच्या सुमारास बस हरिपुरधार बाजारपेठेतून शिमल्याकडे जाण्यासाठी निघाली असताना ही मोठी दुर्घटना घडली. यावेळी बस चालकाच अचानक वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्यावरून घसरून थेट खोल दरीत कोसळली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा बस हरिपुरधार बाजारपेठेतून शिमल्याच्या दिशेने निघाली, त्याच वेळी हा अपघात घडला. बाजारपेठेपासून अवघ्या १०० ते २०० मीटर पुढे जाताच चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्यावरून घसरून थेट खोल दरीत कोसळली. बसमध्ये सुमारे ३६ हून अधिक प्रवासी होते, ज्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची पथकं सक्रिय झाली आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश रोल्टा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५ मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. संगडाह, राजगड आणि ददाहू येथून पोलीस आणि बचाव पथकांना तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक एन.एस. नेगी हे देखील घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Himachal Pradesh Bus Accident: Eight Killed, Many Injured in Sirmour

Web Summary : A private bus plunged into a gorge in Himachal Pradesh's Sirmour district, killing eight and injuring many. The bus, en route to Shimla from Kupvi, crashed near Haripur Dhar after the driver lost control. Rescue operations are underway with local authorities assisting.
टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशAccidentअपघातDeathमृत्यू