राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग, हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकार अडचणीत, भाजपा आणणार अविश्वास प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 03:59 PM2024-02-27T15:59:53+5:302024-02-27T16:00:22+5:30

Himachal Pradesh Rajya Sabha Election 2024: राज्यसभेच्या १५ जागांसाठी आज देशातील उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मतदान होत आहे. या तिन्ही राज्यांमध्ये मतदानादरम्यान, मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झालं आहे. त्यात हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या अनेक आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती समोर येत आहे.

Himachal Pradesh Rajya Sabha Election 2024: Cross voting in Rajya Sabha elections, Congress government in Himachal Pradesh in trouble, BJP to move no-confidence motion | राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग, हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकार अडचणीत, भाजपा आणणार अविश्वास प्रस्ताव

राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग, हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकार अडचणीत, भाजपा आणणार अविश्वास प्रस्ताव

राज्यसभेच्या १५ जागांसाठी आज देशातील उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मतदान होत आहे. या तिन्ही राज्यांमध्ये मतदानादरम्यान, मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झालं आहे. त्यात हिमाचल प्रदेशमध्येकाँग्रेसच्या अनेक आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर भाजपाने सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केल्याने आता राज्यातील सुखविंदर सिंह सुख्खू यांचं सरकारही अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभा निवडणुकीचा निकाल संध्याकाळी जाहीर होणार आहे. तसेच आता भाजपा नेत्यांकडून निकालाची वाट पाहिली जात आहे. 

हिमाचल प्रदेशमधील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी मंगळवारी शिमला येथे मतदान सुरू आहे. सभागृहात काँग्रेसचे ४० आमदार आहेत. तसेच ३ अपक्षांचाही काँग्रेसला पाठिंबा आहे. तसेच त्यांनी काल झालेल्या काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीमध्ये सहभाग घेतला होता. आता मिळत असलेल्या माहितीनुसार जर काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला तर ९-१० आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं असं मानलं जाईल. अशा परिस्थितीत जर भाजपाच्या उमेदवाराचा विजय होईल. त्यानंतर भाजपाकडून राज्यातील काँग्रेस सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो. 

हिमाचल प्रदेशमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांचा सामना भाजपाच्या हर्ष महाजन यांच्याशी होत आहे. हर्ष महाजन हे राज्याचे  माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचे निकटवर्तीय आहे. ते २०२२ मध्ये भाजपात दाखल झाले होते. त्याआधी दोन वेळा ते काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले होते. वीरभद्र सिंह सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिले होते. हर्ष महाजन यांनी मतदान सुरू असताना आपल्या विजयाचा दावा केला आहे. काँग्रेसचे काही आमदार नाराज आहेत तर काही आमदारांना मी मतदानासाठी तयार केले आहे. आता निकाल मतमोजणीनंतर समोर येईल.  

दरम्यान, हिमाचलचे मुख्यमंत्र सुखविंदर सिंह सुक्खू यांनी सांगितले की, आमच्याकडे ४० आमदार आहेत. जर कुणी विकला गेला नाही तर निश्चितपणे आम्हाला ४० मतं  मिळतील. माझ्या मते काँग्रेसच्या विचारधानेमुळे जे लोक जिंकून आले आहेत. ते काँग्रेसला मतदान करतील.  

Web Title: Himachal Pradesh Rajya Sabha Election 2024: Cross voting in Rajya Sabha elections, Congress government in Himachal Pradesh in trouble, BJP to move no-confidence motion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.