शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचल प्रदेशमध्ये बस नदीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 09:20 IST

हिमाचल प्रदेशच्या सिरमोर जिल्ह्यामध्ये रविवारी (25 नोव्हेंबर) भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुलावरून एक खासगी बस कठडा तोडून थेट नदीपात्रात कोसळल्याने अपघात झाला.

ठळक मुद्देहिमाचल प्रदेशच्या सिरमोर जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुलावरून एक खासगी बस कठडा तोडून थेट नदीपात्रात कोसळल्याने अपघात झाला. अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत.

नाहन - हिमाचल प्रदेशच्या सिरमोर जिल्ह्यामध्ये रविवारी (25 नोव्हेंबर) भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुलावरून एक खासगी बस कठडा तोडून थेट नदीपात्रात कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरमौर येथील रेणुका मार्गावर खाद्री गावाजवळ हा अपघात झाला. ही बस नाहन या ठिकाणी जात होती, बसचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. कठडा तोडून ही बस थेट 40 फूट खाली नदीत कोसळली. 

अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. गंभीर जखमी असलेल्या पाच जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी  दाखल झाले असून तेथे बचावकार्य सुरू आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातHimachal Pradeshहिमाचल प्रदेशDeathमृत्यू