शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कंगना रनौत प्रचारात परिधान करतात हिमाचली टोपी, लोकनृत्यातही सहभागी, ‘हिमाचल की बेटी’ ही प्रतिमा मतदारांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 08:25 IST

Himachal Pradesh Lok Sabha Election 2024: मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेली अभिनेत्री कंगना रनौत यांनी ‘हिमाचल की बेटी’ ही आपली प्रतिमा जनमानसात अधिक रुजविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

शिमला - मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेली अभिनेत्री कंगना रनौत यांनी ‘हिमाचल की बेटी’ ही आपली प्रतिमा जनमानसात अधिक रुजविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान त्या आवर्जून हिमाचली टोपी घालत असून गावकऱ्यांबरोबर हिमाचल ‘धाम’ या थाळीचा आस्वाद घेतात. त्या विविध समारंभांमध्ये लोकनृत्यात स्थानिक महिलांसोबत सहभागी होत आहेत. 

सरकाघाट विधानसभा मतदारसंघातील भाम्बला गावच्या मूळ रहिवासी असलेल्या कंगना रनौत यांनी याआधी अनेकदा सांगितले होते की, मी सक्रिय राजकारणात सहभागी होणार आहे. कंगना रनौत प्रचारकार्यात सहभागी होताना कॉटनची साडी किंवा ड्रेस परिधान करतात. त्यांच्या व्हाइट पर्ल नेकलेस, तसेच इअर रिंग्जची देखील चर्चा होताना दिसते. आपले राहणीमान साधे असल्याचे त्या बिंबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

वाद निर्माण होणार नाही याची काळजीकंगना रनौत यांच्या प्रचारकार्यात भाजपचे स्थानिक नेते व हिमाचल प्रदेशमधील विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर सहभागी झाले आहेत. कंगना रनौत यांनी राजकीय तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर वेळोवेळी मतप्रदर्शन केेले. त्यांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे वादंगही निर्माण झाले होते. मात्र, निवडणुकीत प्रचार करताना कोणताही वाद निर्माण होणार नाही याची त्या अतिशय काळजी घेत आहेत. कंगना रनौत यांची लढत राणी प्रतिभा सिंह यांच्याशी होणार आहे. प्रतिभासिंह याआधी तीनदा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाhimachal pradesh lok sabha election 2024हिमाचल प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४