विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 12:56 IST2025-09-13T12:54:40+5:302025-09-13T12:56:12+5:30

स्थानिक प्रशासनाचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि मदत आणि बचावकार्य सुरू केलं.

himachal pradesh bilaspur gutrahan village cloudburst several vehicles buried in debris and farms damaged | विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान

विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान

बिलासपूर जिल्ह्यातील गुतराहन गावात अचानक ढगफुटी झाल्याने परिसरात खळबळ उडाली. नैना देवी विधानसभा मतदारसंघातील नामहोल भागात झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत अनेक वाहनं ढिगाऱ्यात गाडली गेली आणि आजूबाजूच्या शेतीचंही मोठं नुकसान झालं. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही जीवितहानीबद्दल वृत्त नाही, परंतु ग्रामस्थांचे म्हणणं आहे की खूप मोठं नुकसान झालं आहे.

गावकऱ्यांन दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अचानक मुसळधार पाऊस आणि वाहणारे पाणी गावात शिरलं. रस्ते आणि गल्ल्या पाण्याखाली गेल्या आणि शेतातील उभी पिकं वाहून गेली. ग्रामस्थ काश्मीर सिंह म्हणाले, "पाणी आणि ढिगाऱ्याने आमच्या शेताचं नुकसान केलं. भात आणि मक्याच्या पिकांचं पूर्णपणे नुकसान झालं आहे. वाहनंही वाहून गेली आहेत आणि ढिगाऱ्यात अडकली आहेत."

स्थानिक प्रशासनाचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि मदत आणि बचावकार्य सुरू केलं. काही वाहनं ढिगाऱ्यात पूर्णपणे गाडली गेली आहेत, जी काढण्यासाठी वेळ लागू शकतो, असं ग्रामस्थांनी सांगितलं. शेतात साचलेला कचरा आणि वाहणारे पाणी हे शेतकऱ्यांसाठी चिंतेचं कारण बनलं आहे. नुकसानीचे मूल्यांकन करून लवकरच भरपाई प्रक्रिया सुरू केली जाईल असं आश्वासन प्रशासनाने दिलं आहे.

पावसाळ्यात अशा दुर्घटना सामान्य आहेत, परंतु यावेळी नुकसान खूप जास्त झालं आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) असंही म्हटलं आहे की पथकांना सतर्क करण्यात आलं आहे आणि बाधित भागात मदत साहित्य पोहोचवले जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागात पावसाळ्यात अचानक ढगफुटी होणं सामान्य आहे.
 

 

Web Title: himachal pradesh bilaspur gutrahan village cloudburst several vehicles buried in debris and farms damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.