हिमाचल प्रदेशातील पोलीस प्रशासनाने एक मोठं आणि कठोर पाऊल उचललं आहे. राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) अशोक तिवारी यांनी २०२१ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी अदिती सिंह वारंवार रजेवर जात असल्याने त्यांच्या जबाबदाऱ्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या अदिती सिंह 'स्टेट व्हिजिलन्स अँड अँटी करप्शन ब्युरो'च्या (SV&ACB) उत्तर विभागामध्ये पोलीस अधीक्षक (SP) पदावर कार्यरत आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
आदेशानुसार, आयपीएस अधिकारी अदिती सिंह ८ जानेवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत एकूण २५ दिवस रजेवर होत्या. डीजीपींच्या निरीक्षणाखाली असं आलं की, एवढ्या प्रदीर्घ आणि वारंवार घेतलेल्या रजेमुळे त्यांच्या कार्यालयाचं कामकाज सतत प्रभावित होत होतं. प्रशासकीय कामात येणारे अडथळे लक्षात घेऊनच हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
कधी-कधी घेतल्या रजा?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदिती सिंह यांच्याबाबत जारी केलेल्या आदेशात त्यांच्या रजेचा तपशीलही देण्यात आला आहे. अदिती सिंह यांनी ८ जानेवारी ते १२ जानेवारी या काळात दोन दिवस अचानक रजा आणि दोन दिवस आजारपणासाठीची रजा घेतली. त्यानंतर १६ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान त्यांनी पुन्हा ४ दिवसांची रजा घेतली, ज्यात ३ दिवस अचानक रजा आणि १ दिवस आजारपणासाठीच्या रजेचा समावेश होता. यानंतर ८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान त्या पुन्हा रजेवर होत्या.
कोण आहेत अदिती सिंह?
अदिति सिंह या मूळच्या उत्तर प्रदेशातील मेरठ (कंकरखेडा) येथील रहिवासी आहेत. त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण मेरठमधील सोफिया गर्ल्स स्कूलमधून पूर्ण केलं. त्यांचे वडील संजीव सिंह डॉक्टर आहेत आणि आई ज्योती सिंह कलेक्टरेटमध्ये वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. कोरोना काळात घरी राहूनच त्यांनी यूपीएससीची (UPSC) तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात ६७९ वी रँक मिळवून त्या आयपीएस अधिकारी बनल्या.
हिमाचल प्रदेश कॅडर मिळाल्यानंतर त्यांनी राज्याच्या विविध भागात सेवा बजावली आहे. व्हिजिलन्स ब्युरोमध्ये एसपी होण्यापूर्वी त्या सिरमौरमधील पावटा साहिब येथे तैनात होत्या आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) म्हणूनही त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या या मोठ्या रजेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
Web Summary : Himachal Pradesh DGP reassigned responsibilities of IPS Aditi Singh due to frequent leaves impacting office work. Singh, SP of State Vigilance, took 25 days leave. Junior officer given charge due to administrative disruption. Singh's background in Uttar Pradesh highlighted.
Web Summary : हिमाचल प्रदेश में बार-बार छुट्टी पर रहने के कारण आईपीएस अदिति सिंह से कार्यभार छीना गया। डीजीपी ने कार्यालय के कामकाज पर प्रभाव को देखते हुए यह फैसला लिया। अदिति सिंह ने 25 दिन की छुट्टी ली थी। प्रशासनिक बाधाओं के कारण कनिष्ठ अधिकारी को प्रभार दिया गया।