शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

 लालूंच्या घरात हायव्होल्टेज ड्रामा; राबडीदेवींवर ऐश्वर्याला मारहाणीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 9:33 PM

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या घरात पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा झाला आहे.

पाटणाः बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या घरात पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा झाला आहे. रविवारी पाटणास्थित लालू-राबडी यांच्या घरात तेजप्रताप यादव याची पत्नी ऐश्वर्या राय हिला राबडी देवींनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. पाटणातल्या राबडी देवींच्या 10, सर्क्युलर रोडवरच्या घरात हा हंगामा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच राबडी देवींच्या निवासस्थानी पोलीस दाखल झाले आहेत. महिला पोलीस ऐश्वर्या रायला तिकडून घेऊन गेली.ऐश्वर्या राय यांच्या आरोपांवर आरजेडीचे आमदार शक्ती सिंह यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. घटनेच्या वेळी मी तिथे उपस्थित होतो, राबडी देवींनी ऐश्वर्या रॉयला मारहाण केलेली नाही. ऐश्वर्याचे आरोप निराधार आहे. दुसरीकडे तेजप्रताप यादवांच्या समर्थकांनी ऐश्वर्या रायचे वडील चंद्रिया राय यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे. सप्टेंबर महिन्यातही ऐश्वर्या राय यांनी लालू कुटुंबीय मारहाण करत असून, घरातून काढण्यासाठी दबाव निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. ऐश्वर्यानं मीसा भारतींवरही मारहाणीचा आरोप लावला आहे. लालूंचा पुत्र तेजप्रतापनं गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर रोजी पाटण्यातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तेजप्रतापचं आरजेडी नेते चंद्रिका राय आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात ऐश्वर्याबरोबर 12 मे 2018 रोजी लग्न केलं होतं. तेजप्रताप यांनी पत्नी ऐश्वर्यावर प्रतारणेचा आरोप केला होता. तसेच ऐश्वर्यामुळे आईवडील (लालू यादव-राबडी देवी) बराच त्रास झालेला आहे. ऐश्वर्या आणि तेजप्रताप यांच्या वाद काही संपण्याचं नाव घेत नाहीये.