कुठेय मंदी! 'या' बँकेच्या संचालकाला सर्वाधिक वेतन; उदय कोटक यांचा पगार घटला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 01:58 PM2020-07-20T13:58:30+5:302020-07-20T13:59:51+5:30

2019-20 हे वर्ष कंपन्यांना तसे आर्थिक मंदीचेच गेले आहे. त्यात आता कोरोनामुळे बाजारपेठेलाच मोठा फटका बसला आहे.

Highest salary to the director of HDFC Bank; Uday Kotak's salary was reduced | कुठेय मंदी! 'या' बँकेच्या संचालकाला सर्वाधिक वेतन; उदय कोटक यांचा पगार घटला

कुठेय मंदी! 'या' बँकेच्या संचालकाला सर्वाधिक वेतन; उदय कोटक यांचा पगार घटला

Next

मुंबई : देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी हे आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये सर्वाधिक सॅलरी मिळविणारे बँकर बनले आहेत. या काळात त्यांना वेतन आणि भत्ते मिळून 18.92 कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे 38 टक्के जास्त आहेत. बँकेच्या वार्षिक अहवालानुसार पुरी यांना याशिवाय स्टॉक ऑप्शंसद्वारे 161.56 कोटी रुपये मिळाले आहेत. 2018-19 मध्ये त्यांना यातून 42.20 कोटी रुपये मिळाले होते. 


पुरी हे 70 वर्षांच्या वयात निवृत्त होणार आहेत. येत्या ऑक्टोबरला ते निवृत्ती घेतील. त्यांचा वारसदार म्हणून बँकेचे समुह प्रमुख शशिधर जगदीशन यांचा नाव चर्चेत आहे. बँकेच्या रिपोर्टनुसार जगदीशन यांना 2.91 कोटींचे वेतन मिळाले आहे. तर देशातील दुसरी मोठी खासगी बँक आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक संदीप बख्शी यांना 6.31 कोटी रुपये मिळाले आहेत. ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांनी बँकेची धुरा सांभाळली होती. त्यांना पार्ट टाईम पेमेंट म्हणून 4.90 कोटी रुपये मिळाले होते. 


अॅक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अमिताभ चौधरी यांना 2020 मध्ये 6.01 कोटी रुपये वेतन देण्यात आले. तर आर्थिक वर्ष 2019 मध्ये त्यांना तीन महिन्यांसाठी 1.27 कोटी रुपये देण्यात आले होते. तर नुकताच राजीनामा दिलेले बँकेचे रिटेल प्रमुख प्रलय मंडल यांना 2020 साठी 1.83 कोटी रुपये देण्यात आले होते. मंडल हे एचडीएफसी बँकेतही कामाला होते. 


कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांना 2020 मध्ये कमी वेतन देण्यात आले. त्यांना 2.97 कोटी वेतन देण्यात आले. 2019 पेक्षा हे वेतन 18 टक्के कमी आहे. कोटक महिंद्रा बँकेमध्ये 26 टक्के हिस्सेदारी ठेवणाऱ्या कोटक यांना  2019 मध्ये 3.52  कोटी रुपये मिळाले होते.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

हवाई दलाची 'बाहुबली' बैठक; याच आठवड्यात राफेल येतेय, थेट चीनच्या सीमेवर तैनाती?

बाबो! वर्षाला दोन लाख उत्पन्न; स्वीस बँकेत मात्र 196 कोटी; ITAT ची कारवाई

चीन गांगरला! जपान भारतापेक्षाही जबर दणका देण्याच्या तयारीत; 57 कंपन्यांना दिले आदेश

SBI चा करोडो ग्राहकांना निर्वाणीचा इशारा; Video पहाल तर वाचाल

दुधाची पिशवी कोरोना फ्री आहे का? कसे सॅनिटाईज कराल...FSSAI ने दिले उत्तर

चॅलेंज! कोरोनावर जगात कोणीही लस शोधुदे; भारताशिवाय उत्पादन अशक्यच

Web Title: Highest salary to the director of HDFC Bank; Uday Kotak's salary was reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.