शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्भया’ खुन्याच्या फाशीला हायकोर्टाने स्थगिती नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 02:57 IST

सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेविरुद्धची क्युरेटिव याचिका मंगळवारी फेटाळल्यानंतर मुकेश सिंग याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करतानाच ही याचिका केली होती.

नवी दिल्ली: ‘निर्भया’ बलात्कार व खून खटल्यातील मुकेश सिंग या चारपैकी एका खुन्याने त्यांना २२ जानेवारीस फासावर लटकविण्यासाठी जारी केलेल्या डेथ वॉरन्टला स्थगिती देण्यासाठीची याचिका दिल्ली हायकोर्टाने बुधवारी फेटाळली.

सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेविरुद्धची क्युरेटिव याचिका मंगळवारी फेटाळल्यानंतर मुकेश सिंग याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करतानाच ही याचिका केली होती. न्या. मनमोहन आणि न्या. एस. एन. धिंग्रा यांच्या खंडपीठाने ही याचिका अल्प सुनावणीनंतर फेटाळली व दयेच्या अर्जावर राष्ट्रपतींचा निर्णय झाल्यानंतरही मुकेश सिंग डेथ वॉरन्टविरुद्ध सत्र न्यायालयात दाद मागू शकतो, असे नमूद केले.मुकेशच्या वतीने युक्तिवाद करताना रेबेका एम. जॉन यांनी म्हटले की, फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणे हा राज्यघटनेने दिलेला मुलभूत हक्क आहे. तो फेटाळल्यानंतरही त्याविरुद्ध दाद मागण्याचे मार्ग असतात.

गुन्हेगाराला ते मार्ग अनुसरता यावेत यासाठीच दयेचा अर्ज फेटाळल्यानंतरही किमान १४ दिवस फाशी दिली जाऊ नये, असे बंधन सर्वोच्च न्यायालयाने घातले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या निर्णयापासून पुढे १४ दिवसांच्या मुदतीचा हिशेब केला जावा. त्याला विरोध करताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर आचार्य म्हणाले की, प्रस्तुत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी क्युरेटिव याचिका करण्यात आली. शिवाय क्युरेटिव याचिका फेटाळल्यानंतर लगेच दयेचा अर्ज करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या वतीने अ‍ॅड. राहुल मेहरा म्हणाले की, डेथ वॉरन्टला स्थगिती देण्याची आवश्यकताच नाही. डेथ वॉरन्ट २२ तारखेचे असले तरी तोपर्यंत दयेच्या अर्जावर राष्ट्रपतींच्या निर्णय न आल्यास फाशी दिली जाऊ शकणार नाही, हे उघड आहे.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप