शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : मोठी तयारी!'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
2
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
3
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
4
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
5
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
6
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
7
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
8
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
9
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
11
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
12
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
13
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
14
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
15
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
17
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
18
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
19
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
20
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!

अरे! उत्तर प्रदेश में कहाँ हैं सुरक्षा; जया बच्चन यांची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 16:08 IST

उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार पीडितेला जिवंत जाळलं

ठळक मुद्देसमाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी उत्तर प्रदेशातील सुरक्षेवर यक्ष प्रश्न उपस्थित केला आहे. आता उन्नाव येथील सामूहिक बलात्कार आणि जाळून मारल्याच्या घटनेवर जया बच्चन यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

नवी दिल्ली - हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशात खळबळ माजलेली असताना उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सामूहिक बलात्कार पीडितेला मारहाण करत जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने ज्या पाच जणांवर बलात्काराचा आरोप केला आहे, त्यांनीच महिलेवर हल्ला करत हे कृत्य केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनला जात असताना रस्त्यात आरोपींनी तिला थांबवलं आणि मारहाण केली आणि भोसकलं. तसंच जिवंत जाळलं आणि पळ काढला. पीडित महिला ८० टक्के भाजली असून उन्नाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर कानपूर येथील एलएलआर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या प्रकरणावर समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी उत्तर प्रदेशातील सुरक्षेवर यक्ष प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, अरे! उत्तर प्रदेश में कहाँ सुरक्षा हैं? किसी किसी कि सुरक्षा नाही हैं. 

 

जया बच्चन यांनी सांगितले की, राज्यसभेत सुद्धा या विषयावर आवाज उठवता येत नाही. उठवला आवाज तर म्हणतात कठोर भाषा वापरली. हे काय होतंय? जर आम्ही या प्रकरणावर आवाज उठविण्यासाठी कटू शब्द वापरले तर तुम्हाला असं बोलायला नको असं सांगितलं जातं. आता मला असं वाटतं रागाच्या भारत तुम्ही माझ्यासमोर उभे आहेत, तर तुम्हाला पकडून मारावं. तसेच उत्तर प्रदेशात कुठेय सुरक्षा? कोणीही सुरक्षित नाहीय, तुम्हाला अशा घटना सांगेन की आश्चर्य व्यक्त कराल, असे जया बच्चन म्हणाल्या. डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची अतिशय निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण देशातून होत आहे. हैदराबादमध्ये 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून तरुणीला जाळून मारण्यात आल्याची घटना घडली. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. संपूर्ण देशभरातून सोशल मीडियावर या खळबळजनक घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यसभेतही उमटले आहेत. या घटनेनंतर राज्यसभेत खासदारांनी आपला संताप व्यक्त केला होता. त्यावेळी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणावर भाष्य करत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात ठार करा असं जया बच्चन यांनी म्हटलं. तसेच हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणावर सरकारने ठोस उत्तर द्यावं असंही म्हटलं. त्यानंतर आता उन्नाव येथील सामूहिक बलात्कार आणि जाळून मारल्याच्या घटनेवर जया बच्चन यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Jaya Bachchanजया बच्चनUttar Pradeshउत्तर प्रदेशGang Rapeसामूहिक बलात्कार