स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 17:03 IST2025-10-23T17:02:22+5:302025-10-23T17:03:59+5:30
...हा सुतळी बॉम्ब फुटताच त्याच्या तोंडाच्या जबड्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली. यानंतर, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
मध्य प्रदेशातील झाबुआ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 'रील' बनवण्याच्या नादात स्टाइलमारणे एका तरुणाच्या आंगलट आले. त्याला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. झाबुआ जिल्ह्यातील पेटलावद येथे गाय गोहरी अर्थात गोवर्धन पूजेच्या दिवशी एका १८ वर्षीय तरुणाने थेट तोंडातच सुतळी बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न केला. हा सुतळी बॉम्ब फुटताच त्याच्या तोंडाच्या जबड्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली. यानंतर, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुतळी बॉम्ब तोंडात ठेवून फोडला अन्... - -
या तरुणाचे नाव रोहित असे आहे. तो टेमरिया गावाचा रहिवासी आहे. तो बाचीखेडा गावात गाय गोहरी उत्सव बघण्यासाठी गेला होता. उत्सव संपल्यानंतर सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने तोंडात फटाके फोडण्यास सुरुवात केली. त्याने आधी सलग सहा छोटे फटाके तोंडात दाबून फोडले. मात्र, अतिउत्साहाच्या भरात त्याने सातवा सुतळी बॉम्ब आपल्या तोंडात ठेवून फोडला.
सुतळी बॉम्बचा स्फोट एवढा तीव्र होता की, रोहितच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे. पेटलावदच्या एसडीओपी अनुरक्ती सबनानी यांनी या घटनेची पुष्टी केली असून, "गाय गोहरी पर्वानंतर हा तरुण सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तोंडात फटाके फोडत होता, याचवेळी सुतळी बॉम्बच्या स्फोटामुळे रोहित नावाच्या या तरुणाच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली," असे त्यांनी सांगितले.
उपचारासाठी रतलाम येथे -
रोहितला तातडीने पेटलावद येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. येथे प्राथमिक उपचारानंतर, त्याची गंभीर प्रकृती पाहता त्याला पुढील उपचारासाठी रतलाम येथे हलवण्यात आले आहे.