शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

हेमंत सोरेन यांच्या शपथविधीत विरोधक करणार शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:33 IST

अनेक नेत्यांची हजेरी; सहा राज्यांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

रांची : झारखंड मुक्ती मोर्चाकाँग्रेस यांच्या आघाडीचे सरकार रविवारी स्थापन होणार असून, त्या शपथविधीला भाजपविरोधी पक्षांचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. झामुमोचे नेते हेमंत सोरेन उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.दोनच दिवसांनी नववर्ष सुरू होत असल्याने नवे वर्ष भाजपविरोधी पक्षांचे असा त्यांचा नारा असू शकेल, असे दिसते. सोरेन यांच्याबरोबर किती जण शपथ घेणार हे स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसचे किती व कोण मंत्री असतील, हेही जाहीर झालेले नाही. तसेच राष्ट्रीय जनता दलही आघाडीत सहभागी होते व त्यांचा एक जण विजयी झाला आहे. त्याच्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव आमदाराच्या गळ्यातही मंत्रीपदाची माळ पडणार का, हे नक्की नाही.शपथविधीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्यप्रदेशचे कमलनाथ, दिल्लीचे अरविंद केजरीवाल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हजर राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी तसेच अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल, हरीश रावत यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मात्र आपण शपथविधी समारंभाला येऊ शकणार नाही, असे आधीच सोरेन यांना सांगितले आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व बसपाच्या सर्वेसर्वा मायावती याही हजर राहण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव व जितनराम मांझी हे नेतेही हेमंत सोरेन यांच्या शपथविधीला हजर राहतील, असे समजते. (वृत्तसंस्था)पुष्पगुच्छ नकोत, पुस्तके द्याआपणास शुभेच्छा देताना कृपया पुष्पगुच्छ आणू नका, त्याऐवजी पुस्तके द्या, त्याचा उपयोग मला आणि सर्वांनाच होईल, असे आवाहन हेमंत सोरेन यांनी पक्ष कार्यकर्ते, नेते तसेच राज्यातील जनतेला केले आहे. त्यांचे हे आवाहन लोकांना खूपच आवडले आहे.

टॅग्स :Jharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाcongressकाँग्रेस