मुस्लिम हे भगवान रामाचे वंशज, अयोध्येत मंदिर बनवण्यासाठी मदत करा- गिरिराज सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 08:30 IST2018-10-02T08:29:55+5:302018-10-02T08:30:35+5:30

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.

Help Muslims to build a temple in Ayodhya - descendants of Lord Ram, Giriraj Singh | मुस्लिम हे भगवान रामाचे वंशज, अयोध्येत मंदिर बनवण्यासाठी मदत करा- गिरिराज सिंह

मुस्लिम हे भगवान रामाचे वंशज, अयोध्येत मंदिर बनवण्यासाठी मदत करा- गिरिराज सिंह

नवी दिल्ली-  केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मुस्लिम हे रामाचे वंशज असून, त्यांनी राम मंदिर बनवण्यासाठी मदत करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच हिंदूंच्या सहनशीलतेचा बांध फुटला तर ते काशी, मथुरा आणि अयोध्येवर कब्जा करतील. मुस्लिम हे मुगल बादशहा बाबरचे नव्हे, तर रामाचे वंशज आहेत, असंही ते म्हणाले आहेत.  

ते म्हणाले, मुस्लिमांनी राम मंदिर पुनर्निर्माणासाठी मदत केली नाही, तर मला अतीव दुःख होईल, कारण मुस्लिम हे रामाचे वंशज आहेत. तसेच हिंदूंचा संयम सुटल्यास ते मथुरा, काशी आणि अयोध्येवर कब्जा करतील. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भगवान शंकराची पूजा करणा-या हर हर महादेव म्हणणा-या कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. तुम्ही खरंच स्वतःला जर हिंदू समजत असाल तर पार्ट्यांमध्ये बीफ खाणं आणि निवडणुकीपूर्वी मंदिरात जाणं बंद करावं.

गेल्या काही दिवसांपूर्वीही त्यांनी असंच वादग्रस्त विधान केलं होतं. मला वाटतं आमचा पक्ष मजबूत आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करूच, ज्या प्रकारे शिया मुस्लिमांनी राम मंदिर बनवण्यासाठी मदतीचा हात दिला होता, तशाच प्रकारे इतर मुस्लिमांनीही राम मंदिर बनवण्यासाठी सहकार्य करावं. त्यांनी हट्ट सोडून द्यावा, कारण आपण दोघेही हिंदूंचीच संतान आहोत. 

Web Title: Help Muslims to build a temple in Ayodhya - descendants of Lord Ram, Giriraj Singh