हॅलो 4 : हरमल पंचक्रोशीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा

By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:30+5:302015-08-31T21:30:30+5:30

थिवी : हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ओपा-खांडेपार येथील जलशुद्धीकरण प्रकल्प तसेच कुर्टी-फोंडा येथील गोवा डेअरी प्रकल्पाला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. या अभ्यास दौर्‍यात अकरावी वाणिज्य शाखेच्या 67 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विष्णू गावडे व स्नेहा प्रभू यांनी जलशुद्धीकरण कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. अजय यांनी गोवा डेअरी प्रकल्पातील कामाची माहिती दिली. प्राचार्य आशा च्यारी यांच्या मार्गदर्शनाखालीझालेल्या या अभ्यास दौर्‍यात लक्ष्मीकांत गावस, नम्रता नाईक, सुषमा शेटकर तसेच शिवराम पार्सेकर आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)

Hello 4: Study tour of Harmil Panchrooshi students | हॅलो 4 : हरमल पंचक्रोशीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा

हॅलो 4 : हरमल पंचक्रोशीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा

वी : हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ओपा-खांडेपार येथील जलशुद्धीकरण प्रकल्प तसेच कुर्टी-फोंडा येथील गोवा डेअरी प्रकल्पाला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. या अभ्यास दौर्‍यात अकरावी वाणिज्य शाखेच्या 67 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विष्णू गावडे व स्नेहा प्रभू यांनी जलशुद्धीकरण कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. अजय यांनी गोवा डेअरी प्रकल्पातील कामाची माहिती दिली. प्राचार्य आशा च्यारी यांच्या मार्गदर्शनाखालीझालेल्या या अभ्यास दौर्‍यात लक्ष्मीकांत गावस, नम्रता नाईक, सुषमा शेटकर तसेच शिवराम पार्सेकर आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Hello 4: Study tour of Harmil Panchrooshi students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.