हॅलो ४- म्हापसा येथे उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:06+5:302014-12-20T22:28:06+5:30
म्हापसा : उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी म्हापसा येथे आयोजित गोवा मुक्तिदिन कार्यक्रमात तिरंगा फडकविला.

हॅलो ४- म्हापसा येथे उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
म हापसा : उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी म्हापसा येथे आयोजित गोवा मुक्तिदिन कार्यक्रमात तिरंगा फडकविला.याप्रसंगी डसोझा म्हणाले, शांततेशिवाय कोणतेही राज्य किंवा राष्ट्र प्रगती साधू शकत नाही. राज्याची शांतता व सलोखा बळकट करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्याने आरोग्य, शिक्षण, उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात चांगली कामगिरी बजाविली आहे. यापुढेही विकास अपेक्षित असून लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.या वेळी कला व संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर, आमदार ग्लेन टिकलो, माजी सभापती उल्हास अस्नोडकर, प्रभाकर येंडे, लवचंद्र केणी (दोन्ही स्वातंत्र्यसैनिक), म्हापसा नगराध्यक्ष संदीप फळारी, उपजिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुर्वेकर, नगरसेवक सुधीर कांदोळकर, डीवायएसपी महेश गावकर, पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर, सरकारी अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. गजानन लोटलीकर यांनी स्वागत केले.