हॅलो 2 : गणेश
By Admin | Updated: July 30, 2015 23:14 IST2015-07-30T23:14:06+5:302015-07-30T23:14:06+5:30
चित्रशाळा जागू लागल्या

हॅलो 2 : गणेश
च त्रशाळा जागू लागल्या- ग्रामीण भागांत गणेशमूर्ती बनवण्यावर जोरहरमल : गोमंतकीयाचा सर्वांत मोठा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीपूर्वी साजरा होणारा नागपंचमी सण महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यासाठी तयारी मूर्तीकार दिवस-रात्र राबून करत आहेत. पालये येथील प्रसिद्ध मूर्तीकार अरुण गवंडी हेही सध्या मूर्तीकामात व्यस्त आहेत. पेडणे तालुक्यातील पालये गावात मूर्तीकारांची संख्या लक्षणीय आहे. चिकणमाती, टेराकोटा, थर्माकॉल आदी साहित्याचा वापर करून मूर्ती, देखावे सादर करणार्या मूर्तीकारांची येथे मांदियाळी आहे. प्रत्येक मूर्तीत झोकून देत त्यात हुबेहूबपणा आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अरुण गवंडी यांच्या घराशेजारी असलेल्या चित्रशाळेमुळे बालवयातच ते चित्रकलेकडे वळले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. गोवा हस्तकला महामंडळाच्या विविध दालनांत असणारे लहान पुतळे, मूर्ती व अन्य कलावस्तू गवंडी यांनी तयार केल्या आहेत. नेपाळ, ऑस्ट्रेलिया, र्शीलंका तसेच भारतातील अनेक राज्यांमध्ये गवंडी यांनी आपली कलाकृती सादर करून गोव्याचे नाव उंचावले आहे. सध्या ते स्वत:च्या घरी गणेशमूर्ती, नागोबा आणि देखावे तयार करण्यात गुंतले आहे. लोकांना हव्या त्या पद्धतीने मूर्ती बनवून देण्यावर त्यांचा भर असतो. फोटो : मूर्तीकामात गुंतलेले मूर्तीकार अरुण गवंडी.