हॅलो 2 : काणकोण
By Admin | Updated: July 30, 2015 23:14 IST2015-07-30T23:14:06+5:302015-07-30T23:14:06+5:30
काणकोणात वानरांचा उच्छाद

हॅलो 2 : काणकोण
क णकोणात वानरांचा उच्छाद- फळबागायतींची नासाडी; गावठी फळे महागलीकाणकोण : काणकोणात वानरांकडून बागायतीतील फळांचा विध्वंस मोठय़ा प्रमाणात वाढल्याने बागायतदार शेतकर्यांना अपरिमित नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे गावठी फळांचे दर आकाशाला भिडले आहेत. वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यातयेत आहे. काणकोणात लोकवस्तीच्या ठिकाणी वानरांच्या बर्याच टोळ्या आहेत. हे वानर घरांच्या छतावरून उड्या मारत फिरतात. त्यामुळे कौले, सिमेंटचे पत्रे फुटून नुकसान होते. ऐन पावसाळ्यात कौले फुटल्याने घरात पावसाचे पाणी येते. पावसाळ्यातती बदलणेही कठीण होऊन जाते. मोठय़ा वानरांचे दिवस-रात्र बागायतीत वास्तव्य असते. शेवग्याच्या झाडावर आलेली कोवळी पाने वानर खातात. शेवग्याच्या शेंगा येण्याआधीच कोवळ्या फांद्या मोडून खातात. त्यामुळे शेवग्याच्या शेंगांचे उत्पादन कमालीचे घटल्याने दहा रुपयाला तीन-चार शेंगा असा दर झाला आहे. पावसाळ्यातील नीरफणसांचा वानरांकडून फडशा पाडला जातो. खेडेगावात प्रत्येक घराच्या आवारात नीरफणसाचे झाड लावले जायचे. माकडांच्या त्रासामुळे असलेले झाडही तोडून टाकण्याकडे कल वाढला आहे. 10-15 रुपयांना एक या दराने मिळणार्या नीरफणसाचा दर 60 ते 75 रुपयांवर पोचला आहे. शहरात तर हा दर 100ते 150 रुपयांपर्यंत वाढला आहे. चिकू, केळी यांचीही नासाडी वानरांकडून केली जात आहे. त्यामुळे या भागातील केळ्यांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. 75 ते 80 रुपये डझन याप्रमाणे केळी बाजारात विकली जातात. आंबा-फणसाच्या मोसमातही वानरांची चंगळ असते. झाडावरील आंबे व फणस यांचा फडशा वानर पाडतात. हाकलले तरी सहसा जात नाहीत. छोटे वानर (खेतीं) कच्चे नारळ खातात. त्यामुळे नारळाच्या उत्पादनात घट झाली आहे. अलीकडे तर वानर वाहनांवर बसून वाहनाचे आरसे फोडून नुकसान करू लागले आहेत. या वानरांचा वन खात्याने सोक्षमोक्ष लावला तर अनेक प्रकारची नुकसान टळेल, असे र्शीकांत सुधीर यांनी सांगितले. कोट‘‘या वानरांचा बंदोबस्त करायला हवा. कृषी खात्याकडून अनुदान दिले नसले तरी चालेल; पण वानरांचा बंदोबस्त केला तर पुरेसे उत्पादन नक्कीच मिळेल. - विजयकुमार प्रभुगावकर असे प्रभुगावकर, बागायतदार, महालवाडा-पैंगीण