शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भीषण कट; आयईडी स्फोटांमुळे ११ जवान जखमी, तिघांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 12:30 IST

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ल्यामुळे ११ जवान जखमी झाले आहेत.

IED Blast in Chhattisgarh: नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा सुरक्षा दलांवर मोठा हल्ला झाला आहे. कर्रेगुट्टा टेकड्यांच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या अनेक प्रेशर आयईडी स्फोटांच्या मालिकेत ११ सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. रविवारी नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान ही घटना घडली असून सोमवारी बिजापूर पोलिसांनी याला अधिकृत दुजोरा दिला.

जखमींमध्ये डीआरजी आणि कोब्रा कमांडोंचा समावेश

जखमी झालेल्या ११ जवानांपैकी १० जवान हे राज्य पोलिसांच्या विशेष जिल्हा रिझर्व्ह गार्ड पथकाचे आहेत, तर एक जवान सीआरपीएफच्या एलिट कोब्रा (CoBRA) बटालियनचा आहे. जखमी कोब्रा जवानाची ओळख उपनिरीक्षक रुद्रेश सिंह (२१० वी बटालियन) अशी पटली आहे. रुद्रेश सिंह आणि अन्य दोन डीआरजी जवानांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे, तर सर्वात चिंताजनक बाब म्हणजे तीन जवानांच्या डोळ्यांत स्फोटातील छर्रे घुसले आहेत. सर्व जखमींना तातडीने हेलिकॉप्टरने रायपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

ज्या कर्रेगुट्टा टेकड्यांच्या परिसरात हा हल्ला झाला, तो भाग नक्षलवाद्यांचा सर्वात सुरक्षित तळ मानला जातो. यापूर्वी एप्रिल-मे २०२५ मध्ये सुरक्षा दलांनी येथे २१ दिवसांची सर्वात मोठी मोहीम राबवली होती. त्या मोहिमेत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. तसेच ३५ अत्याधुनिक शस्त्रे, ४५० पेक्षा जास्त सुरुंग आणि सुमारे १२ हजार किलो रसद व साहित्य जप्त केले होते. या मोठ्या कारवाईचा बदला घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा सापळा रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नक्षलविरोधी मोहिमेला वेग

नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ताडपाला गावात सुरक्षा दलांचा नवीन कॅम्प उभारण्यात आला होता. तेव्हापासून नक्षलवादी सातत्याने सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्फोटानंतर संपूर्ण जंगलाला वेढा घालण्यात आला असून अतिरिक्त कुमक पाठवून नक्षल्यांचा शोध घेतला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Naxalite Ambush in Chhattisgarh: IED Blasts Injure 11 Security Personnel

Web Summary : In Chhattisgarh's Bijapur, Naxalite IED blasts injured 11 security personnel during an anti-Naxal operation. The injured, including DRG and CoBRA commandos, were airlifted to Raipur for treatment. Three suffered severe eye injuries. The attack is suspected retaliation for a prior operation.
टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादी