Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 17:17 IST2025-07-05T17:17:01+5:302025-07-05T17:17:39+5:30
Himachal Pradesh Flood : हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटनांनी जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या विध्वंसात आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटनांनी जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या विध्वंसात आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३७ जण अजूनही बेपत्ता आहेत. हवामान खात्याने रविवारी हिमाचलमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. याबाबत मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी सांगितलं की, सरकार पूर्णपणे सतर्क आहे.
हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या १९ घटना आणि त्यानंतर अचानक आलेल्या पुरामुळे विनाश झाला आहे. या घटनांमध्ये ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याच्या रेड अलर्टच्या इशाऱ्याने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. हवामान खात्याने हिमाचलच्या ३ जिल्ह्यांमध्ये ६ जुलै रोजी रेड अलर्टचा इशारा दिला आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
सरकार सतर्क आणि सज्ज आहे - मुख्यमंत्री
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू म्हणाले की, सरकार पूर्णपणे सतर्क आहे. मंडीच्या बाधित भागात मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री बाधित भागाला भेट देत आहेत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री देखील परिसरातील रस्त्यांची स्थिती आणि दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी निघाले आहेत.
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान हे सिराज मतदारसंघात झालं आहे. जयराम ठाकूर यांचा हा मतदारसंघ आहे. आतापर्यंत येथे सुमारे १५ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३० जण बेपत्ता आहेत. जयराम ठाकूर यांनी सरकारला माझ्या भागात सर्वात जास्त नुकसान झालं आहे. सरकारने लवकरच रस्ते सुरू करावेत आणि गरिबांना मदत करण्यासाठी रेशन पोहोचवावं असं म्हटलं आहे.