वातावरणातील उष्मा कायम

By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:19+5:302015-05-18T01:16:19+5:30

पारा चढणार : कमाल आणि किमान तपमानात सातत्य

Heat in the atmosphere | वातावरणातील उष्मा कायम

वातावरणातील उष्मा कायम

रा चढणार : कमाल आणि किमान तपमानात सातत्य
नाशिक : दोन दिवसांपासून चाळीशीच्या पुढे गेलेल्या तपमानाने चाळीशी कायम ठेवल्याने नाशिककर उकाड्याने हैराण झाले आहेत. दिवसभर उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने त्यापासून संरक्षण करीत कामांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते आहे. येत्या काळात तपमानाचा हा पारा ४३च्या आसपास जाण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
काही दिवसांपूर्वी शहरात ढगाळ हवामानाने मुक्काम ठोकला होता. दरम्यानच्या काळात जोरदार पाऊस व गारपिटीनेही तडाखा दिला. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवत होता. सकाळी थंडी, दुपारी ऊन अशी विषम परिस्थितीही नाशिककरांनी काही दिवस अनुभवली. आठवडाभरापासून हे वातावरण निवळले असून, सकाळी दहा वाजेपासूनच कडक ऊन जाणवत आहे. पाऊस पडून गेल्यावर अपेक्षेप्रमाणेच मार्च महिन्याच्या अंतिम दिवसात पारा चाळीशीकडे पोहोचला होता. आता मे महिन्यात पार्‍याने तीनदा चाळीशी गाठल्याने वातावरणातील उष्मा कायम आहे. त्यातच काही ठिकाणी तुरळक पाऊस झाल्यानंतरही गारवा मिळाला नाही, तर उलट त्यात वाढच झाल्याचे दिसून आले.
याचदरम्यान कमाल तपमान वाढत असताना किमान तपमानही वाढीस लागल्याने रात्रीही उष्णतेचा सामना करावा लागात आहे. वाढत्या उष्णतेने नागरिक डोक्यावर टोपी, उपरणे, तर महिला सनकोट परिधान करूनच घराबाहेर पडत आहेत. शहरातील रसवंतीगृहे गर्दी दिसत असून, शीतपेयांच्या मागणीतही वाढ झाली आहे. सायंकाळी आइस्क्रीम पार्लरवरील गर्दीही वाढली आहे.
तपमानाचा पारा चढणार
एकीकडे कडन ऊन पडत असतानाच, दुसरीकडे वेधशाळेच्या सूत्रांनी पुन्हा ढगाळ वातावरणाचे सावट राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यातच मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने पारा घसरण्याची शक्यता आहे. सध्या कमाल तपमान चाळीशीच्या आसपास असतानाच किमान तपमानानेही तेविशी पार केली आहे. त्यामुळे केवळ पहाटेच्या सुमारासच गारवा जाणवतो. त्यातच येत्या काही दिवसांत नाशिकमध्ये तपमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. हा पारा ४३पर्यंत जाऊ शकतो असेही सांगण्यात आले आहे.
शहराचे तपमान असे....
तारीख कमाल किमान
१७ ३९.७ २३.५
१६ ४०.१ २४.२
१५ ३७.५ २३.२
१४ ३७.१ २३.०
१३ ३७.० २२.६

Web Title: Heat in the atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.