हृदयद्रावक! दोन कार एकमेकांवर आदळल्या; परीक्षेला जाणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:30 IST2024-12-09T11:30:39+5:302024-12-09T11:30:46+5:30

टायर फुटल्याने वेगाने जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटले व ती समोरून येणाऱ्या लेनमध्ये घुसली. यावेळी समोरून येणाऱ्या कारची जोरदार टक्कर झाली.

Heartbreaking! Two cars collide, killing five exam-going students Gujrat junagadh | हृदयद्रावक! दोन कार एकमेकांवर आदळल्या; परीक्षेला जाणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू

हृदयद्रावक! दोन कार एकमेकांवर आदळल्या; परीक्षेला जाणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू

गुजरातच्या जुनागढ भागात सकाळीच भीषण अपघात झाला आहे. दोन कार एकमेकांवर समोरासमोर आदळल्या आहेत. यामध्ये परीक्षेला जात असलेल्या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून दुसऱ्या कारमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. 

जुनागढ-वेरावर हायवेवर ही दुर्घटना घडली आहे. भंडुरी गावाजवळ आले असता एका कारचे नियंत्रण सुटले व ती डिव्हायडरवरून पलिकडे घुसली. यावेळी समोरून येणाऱ्या कारला आदळली. या भीषण अपघातात दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे. 

हा अपघात टायर फुटल्याने झाल्याचे सांगितले जात आहे. टायर फुटल्याने वेगाने जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटले व ती समोरून येणाऱ्या लेनमध्ये घुसली. यावेळी समोरून येणाऱ्या कारची जोरदार टक्कर झाली. अपघाताची तीव्रता दोन्ही कारची अवस्था पाहून लक्षात येत आहे. 

Web Title: Heartbreaking! Two cars collide, killing five exam-going students Gujrat junagadh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात