हृदयद्रावक घटना! चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, चावे घेतल्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 08:46 IST2023-02-22T08:46:01+5:302023-02-22T08:46:59+5:30

गंगाधर चार वर्षांपूर्वी पत्नी आणि दोन मुलांसह कामानिमित्त हैदराबादला आले होते. ते अंबरपेठेतील एका कार सर्व्हिस सेंटरमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.

Heartbreaking incident! Small child attacked by stray dogs, bitten to death | हृदयद्रावक घटना! चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, चावे घेतल्याने मृत्यू

हृदयद्रावक घटना! चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, चावे घेतल्याने मृत्यू

हैदराबाद : येथील बाग अंबरपेट परिसरात रस्त्याने जाणाऱ्या ४ वर्षांच्या निरागस मुलाला भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून ओरबाडले. ६ कुत्र्यांनी तो मरेपर्यंत त्याला चावे घेतले. नंतर कुत्र्यांनी त्याला तेथे उभ्या कारखाली ओढत नेले.

रविवारी घडलेली संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कुत्र्यांनी ज्या निष्पापाचा बळी घेतला, त्याचे नाव प्रदीप. तो एरुकुला भागात राहणाऱ्या गंगाधर या सुरक्षारक्षकाचा मुलगा होता. गंगाधर चार वर्षांपूर्वी पत्नी आणि दोन मुलांसह कामानिमित्त हैदराबादला आले होते. ते अंबरपेठेतील एका कार सर्व्हिस सेंटरमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. गंगाधर रविवारी प्रदीपला सोबत घेऊन कामावर आले होते. काही वेळाने मुलाला त्यांच्या केबिनमध्ये सोडून गंगाधर कामानिमित्त बाहेर गेले.

थोड्या वेळाने प्रदीप केबिनमधून बाहेर आला आणि पार्किंगमध्ये पोहोचला. कॅम्पसमध्ये तो एकटाच फिरत असताना त्याच्यावर ३ कुत्र्यांनी हल्ला केला. निष्पाप प्रदीप खाली पडल्यानंतर आणखी ३ लहान कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. प्रदीपने आरडाओरडा केला. मात्र, कोणीही त्याच्या मदतीला आले नाही. तो बेशुद्ध झाल्यानंतर कुत्र्यांनी त्याला ओढत कारखाली नेले. जखमी प्रदीपचा जीव केव्हाच गेला होता.

Web Title: Heartbreaking incident! Small child attacked by stray dogs, bitten to death