शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ह्रदय पिळवटून टाकणारी घटना! मुलाने आयुष्य संपवलं, आईवडिलांनी डोळे केले दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 13:37 IST

नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कोटा शहरात तब्बल चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील एका विद्यार्थ्याने शनिवारी आयुष्य संपवलं. 

तो जेईई परीक्षेची तयारी करण्यासाठी कोटामध्ये आला होता. कोटामध्ये आजीसोबत राहायचा. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. मनन जैन असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, त्यांच्या आत्महत्येमुळे आईवडिलांवर मोठा आघात झाला आहे. मननचे डोळे दान करण्याचा निर्णय त्याच्या आईवडिलांनी घेतला. 

कोटा शहरातील जवाहर नगर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. पोलीस अधिकारी राम लक्ष्मण गुर्जर यांनी सांगितले की, "मनन बुंदी जिल्ह्यातील इंदरगढचा रहिवाशी होता. तो मागील तीन वर्षांपासून त्यांच्या मावस भावसोबत आजीच्या घरी राहत होता. तो जेईई परीक्षेची तयारी करत होता."

"तो अभ्यासात हुशार होता. पण, त्याने आत्महत्या का केली, याचे कारण कळू शकले नाही. आम्ही त्याचा मृतदेह एमबीएस रुग्णालयातील शव विभागात ठेवला आहे. त्याचे कुटुंबीय आल्यानंतर त्याच्याकडे सोपवला जाईल", असे गुर्जर म्हणाले. 

मननचे मामा महावीर जैन यांनी सांगितले की, "मननचे वडील मनिष जैन हे इंदरगढमध्ये मोबाईलचे काम करतात. तो मावसभावासह आजीच्या घरात राहत होता. हे घडण्यापूर्वी एक दिवस आधीच त्याचं घरी बोलणं झालं होतं. पण, आज त्याने फोन उचलला नाही, त्यामुळे आम्हाला चिंता वाटू लागली. आम्ही जेव्हा घरी जाऊन बघितले, तेव्हा त्याने आत्महत्या केली होती."

मनन जैनचे डोळे दान; आईवडिलांनी घेतला निर्णय

मननच्या आईवडिलांनी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला. ते मृतदेह घेऊन बुंदीला निघून गेले. महावीर जैन यांनी सांगितले की, ममनचे डोळे मात्र दान करण्यात आले आहेत. जेणेकरून त्याच्या डोळ्याने दुसऱ्या कुणाला हे जग बघता यावं.   गेल्या १८ दिवसात कोटामध्ये चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून विविध उपाययोजना करूनही आत्महत्यांचे हे सत्र अजूनही थांबलेले नाही. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीEducationशिक्षण