शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

हृदयद्रावक! गरिबीमुळे मजुराचा मृतदेह गावी नेता न आल्याने कुटुंबाने प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 4:06 PM

लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या निकटवर्तीयांच्या सुख-दुःखात सहभागी होणे अशक्य झाले आहे.  दरम्यान, असाच एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र जवळपास गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले लॉकडाऊन गोरगरीबांसाठी दुहेरी संकट ठरत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. तर अनेकांना आपल्या निकटवर्तीयांच्या सुख-दुःखात सहभागी होणे अशक्य झाले आहे.  दरम्यान, असाच एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. कांजण्या होऊन दिल्लीतमृत्यू झालेल्या एका मजुराचा मृतदेह गावी आणता न आल्याने त्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याची वेळ कुटुंबीयांवर आली. 

हा प्रकार उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात घडला. येथील सुनील मजूर दिल्लीत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, 37 वर्षीय सुनीलचा कांजण्या होऊन मृत्यू झाला. मात्र प्रचंड गरिबीमुळे त्याच्या कुटुंबाला त्याचा मृतदेह गावी आणण्याची व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे अखेरीस त्याच्या कुटुंबाने प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. 

याबाबत सुनीलची पत्नी पूनम हिने सांगितले की, सुरुवातीला आम्ही सुनीलचा मृतदेह परत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते शक्य झाले नाही. त्यानंतर गावच्या सरपंचांना सांगून आम्ही दिल्ली पोलिसांना फोन करून त्यांच्यावर दिल्लीतच अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. माझी लहान मुले आहेत. सध्या रेल्वे बंद आहेत. खासगी गाडीचे भाडे परवडणारे नाही. लॉकडाऊन आणि आर्थिक अडचणीमुळे आम्ही मृतदेह आणण्यासाठी दिल्लीत येऊ शकत नाही, असे मी पोलिसांना सांगितले.'दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सुनीलवरच्या अंत्यसंस्काराची औपचारिकता पूर्ण केलेली नाही. अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांकडून उत्तर प्रदेश सरकारच्या परवानगीची वाट ते पाहत आहेत. आता सुनीलच्या पत्नीने परवानगी पत्रावर सह्या केल्या असून, हा अर्ज लवकरच दिल्ली पोलिसांपर्यंत पोहोचेल असे त्याच्या गावाच्या सरपंचाने सांगितले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्लीDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या