नवरात्रौत्सवादरम्यान मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील माता राणी मंदिरात गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सोनम नावाची एक महिला तिच्या नवऱ्यासोबत "ओ मेरे ढोलना, दामन न छोड़ना " या गाण्यावर आनंदाने नाचत होती. याच दरम्यान नाचता नाचता ती अचानक खाली कोसळली. हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
नवऱ्यासोबत नाचताना १९ वर्षीय सोनमचा जागीच मृत्यू झाला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आलेली नाही. व्हिडिओमध्ये देवीच्या मूर्तीसमोर एक महिला नाचताना, गरबा खेळताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचा नवरा देखील होता. अचानक नाचताना ती खाली पडते. तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांना वाटतं की, सोनम अभिनय करत आहे आणि ते हसायला लागतात.
सोनम खाली पडल्यानंतर सर्वांना वाटतं की ती हे मुद्दाम करत आहे. पण ती जेव्हा उठली नाही तेव्हा तिचा नवरा कृष्णा पाल तिला उचलण्यासाठी खाली वाकतो. त्याला सोनम कोणतीही हालचाल करताना दिसत नाही. यामुळे एकच गोंधळ उडतो. सर्वजण सोनमला डॉक्टरकडे घेऊन जातात, परंतु तिला मृत घोषित करण्यात आलं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कानगाव परिसरातील टेमला येथील रहिवासी संदीप कोलते यांनी सोनम असं महिलेचं नाव असून ती १९ वर्षांची होती असं सांगितलं. सोनम त्यांच्या शेजारी राहत होती. अवघ्या चार महिन्यापूर्वी मे महिन्यात पळसी गावातील कृष्णा पालशी तिचं लग्न झालं होतं. सोनमचा नाचताना आणि नंतर खाली पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Web Summary : During Navratri in Madhya Pradesh, 19-year-old Sonam collapsed and died of a heart attack while dancing Garba with her husband. Initially mistaken for acting, her sudden death shocked everyone. She had been married for four months.
Web Summary : मध्य प्रदेश में गरबा करते समय 19 वर्षीय सोनम की दिल का दौरा पड़ने से मौत हो गई। पति के साथ नाचते हुए अचानक गिरी, जिसे पहले अभिनय समझा गया। चार महीने पहले ही हुई थी शादी।