धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 20:37 IST2025-05-27T20:34:07+5:302025-05-27T20:37:59+5:30

१३ वर्षीय मेघ शाह याच्या २४ मे रोजी पहाटे १ वाजता छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्याने वसतिगृह सहाय्यकाला या त्रासाबद्दल सांगितले.

Heart attack mistaken for acidity, 13-year-old student dies in Gujarat | धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू

धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू

गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील तपोवन आश्रमशाळेत शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या मध्य प्रदेशातील नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. १३ वर्षांच्या मेघ शाह याला मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला, पण वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना ते अ‍ॅसिडिटी वाटले. त्यांनी त्याला प्रथमोपचार दिला. रात्रभर छातीत असह्य वेदना होत असलेल्या मेघचे सकाळी रुग्णालयात निधन झाले. 

या घटनेनंतर, आश्रम व्यवस्थापनाने वसतिगृह सहाय्यक हर्षद राठवा यांना निष्काळजीपणाबद्दल निलंबित केले आहे.

प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  

मध्य प्रदेशातील रहिवासी असलेला १३ वर्षीय मेघ शाह गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील तपोवन आश्रमशाळेत शिक्षण घेत होता. २४ मे रोजी पहाटे १ वाजता त्याच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्याने वसतिगृह सहाय्यकाला या त्रासाबद्दल सांगितले. वसतिगृह सहाय्यकाला वाटले की मेघला अ‍ॅसिडिटीचा त्रास होत आहे. यावर विश्वास ठेवून त्यांनी या १३ वर्षांच्या मुलावर उपचार सुरू केले. 

संस्थेचे व्यवस्थापक गंगाधर पांडे म्हणाले की, या संपूर्ण घटनेत निष्काळजीपणा करणऱ्या सहाय्यक हर्षद राठवा याला निलंबित करण्यात आले आहे. जेव्हा विद्यार्थ्याने वेदना होत असल्याची तक्रार केली तेव्हा हर्षद राठवा यांनी त्याला मलम लावले आणि अ‍ॅसिडिटीवरील औषध दिले.

मेघच्या वेदना असह्य झाल्या. रात्रभर वसतिगृहात त्रास सहन केल्यानंतर, सकाळी त्याला रुग्णालयात दाख करण्यात आले. पण  तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. वेळेवर उपचार न मिळाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. 

मेघ शाह या विद्यार्थ्याचा बरवानी येथील खेतिया येथील रहिवासी होती. कुटुंबाने दोषींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना अर्ज दिला आहे. मात्र, नवसारी ग्रामीण पोलिसांनी प्राथमिक वैद्यकीय तपासणीच्या आधारे अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Heart attack mistaken for acidity, 13-year-old student dies in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.