शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
4
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
5
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री
7
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
8
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
9
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
10
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
11
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
12
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
13
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
14
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
15
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
16
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
17
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
18
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
19
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
20
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य

मराठा आरक्षण क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी पूर्ण; निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 06:33 IST

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या बंद कक्षात झाली सुनावणी

नवी दिल्ली : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या बंद कक्षात सुनावणी झाली. मात्र या याचिकेवर निर्णय काय झाला हे स्पष्ट झालेले नसून तूर्तास निकालाचा आजचा मुहूर्त टळला आहे. हा निकाल गुरुवारी, शनिवारी किंवा २९ जानेवारीनंतर कधीही जाहीर होऊ शकतो.

महाराष्ट्र शासनविरुद्ध जयश्री पाटील आणि विनोद पाटीलविरुद्ध जयश्री पाटील प्रकरणातील दोन क्युरेटिव्ह याचिका एकत्र करुन नव्याने विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड तसेच त्यांचे सहकारी न्या. संजीव खन्ना आणि न्या. भूषण गवई यांच्या समक्ष निर्णयार्थ ठेवण्यात आल्या होत्या. पण सुनावणीचा निकाल मात्र आज जाहीर करण्यात आलेला नाही.

न्या. शिंदे समितीला मुदतवाढमराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यास गठित करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

सरकारला भरपूर वेळ दिला, आता माघार नाही - मनोज जरांगे-पाटीलमी हेका धरतो, सरकारला वेळ देत नाही’ ही टीका चुकीची आहे. सरकारला सात महिन्यांपेक्षा जास्त वेळ दिला, आणखी किती वेळ द्यायचा, आता माघार घेणार नाही. मुंबईत नक्की जाणारच.     - मनोज जरांगे-पाटील

पदयात्रेच्या मार्गात केला बदलबंडगार्डन पूल ते जहांगीर हॉस्पिटल हा मार्ग मेट्रोमुळे अरुंद झाल्याने पुणे स्टेशन भागात वाहतुकीचा बोजवारा उडण्याची शक्यता होती. पोलिसांनी जरांगे-पाटील यांना मार्ग बदलण्याची विनंती करून पदयात्रेचा मार्ग बदलला.

आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक; आंदोलन मागे घ्यावे - मुख्यमंत्रीसातारा : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मराठा समाज मागास कसा आहे, याबाबत मागासवर्ग आयोगाच्या मार्गदर्शनाखाली १ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन टिकणारे आरक्षण देण्याबाबत सरकार निर्णय घेणार आहे. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केले. महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब या आपल्या गावी देवाच्या यात्रेनिमित्त आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार