नवी दिल्ली : २००२ च्या गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या “इंडिया : द मोदी क्वेश्चन” वृत्तपटावर बंदी घालण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी (दि. ६ फेब्रुवारी) सुनावणी करणार आहे.सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ज्येष्ठ विधीज्ञ, कार्यकर्ते प्रशांत भूषण यांच्या वतीने उपस्थित वकील एम. एल. शर्मा व ज्येष्ठ वकील सी. यू. सिंग यांच्या युक्तिवादाची दखल घेऊन त्यांच्या स्वतंत्र जनहित याचिका तातडीने पटलावर घेण्याचे निर्देश दिले. शर्मा यांनी वृत्तपटावर बंदी घालण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली.
बीबीसीच्या ‘त्या’ माहितीपटावर सोमवारी सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 05:55 IST