समान पाणी वाटपाच्या मुद्यावर आमदार ठाम मुंबईला सुनावणी : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने निकाल ठेवला राखीव
By Admin | Updated: December 1, 2015 23:36 IST2015-12-01T23:36:52+5:302015-12-01T23:36:52+5:30
मुख्य १ साठी

समान पाणी वाटपाच्या मुद्यावर आमदार ठाम मुंबईला सुनावणी : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने निकाल ठेवला राखीव
म ख्य १ साठीजळगाव : गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका आणि पाणी योजनांचा विचार करता समान पाणी वाटपाचे तत्व लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातील पाच धरणांमधून गिरणा धरणात २५ टक्के पाणी सोडण्यात यावे या विषयावर जळगाव जिल्ह्यातील आमदारांनी ठामपणे बाजू मांडली.महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण समितीसमोर मुंबई येथे मंगळवारी दुपारी १२ ते साडे तीन यावेळेत ही सुनावणी झाली. या सुनावणीला चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील, पाचोर्याचे आमदार किशोर पाटील, जळगाव ग्रामीण मतदार संघाचे आमदार गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, नाशिक जिल्ह्यातील आमदार व सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आमदार राहुल अहेर, आमदार शेख, आमदार जे.पी.गावित, आमदार दीपिका चव्हाण यांच्यासह नाशिकचे महापौर, नाशिकचे मनपा आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते.नाशिक जिल्ह्यातील नागासाक्या, केळझर, हरणबारी, पुनोद, चणकापूर हे पाचही धरण शंभर टक्के भरलेले आहेत. या धरणातून २५ टक्के पाणी गिरणा धरणात पाणी सोडल्यास जळगाव जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सांगितले.नाशिक जिल्ह्यातील पाचही धरणांमधून पाणी सोडण्यास सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी विरोध केला. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दोन्ही बाजूचा निर्णय ऐकून घेत निकाल राखीव ठेवला आहे. आठवडाभरात निर्णय होण्याची या प्रकरणी शक्यता आहे.