हेडफोनने घेतला डॉक्टर तरुणीचा बळी

By Admin | Updated: August 10, 2015 00:28 IST2015-08-10T00:28:00+5:302015-08-10T00:28:00+5:30

सांगली : कानाला हेडफोन लावून रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना मालगाडीची धडक बसल्याने सांगलीतील डॉक्टर तरुणी नीता पंडित गायकवाड (३४) ही जागीच ठार झाली. विश्रामबाग रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली.

Headphone victim is the victim of a doctor | हेडफोनने घेतला डॉक्टर तरुणीचा बळी

हेडफोनने घेतला डॉक्टर तरुणीचा बळी

ंगली : कानाला हेडफोन लावून रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना मालगाडीची धडक बसल्याने सांगलीतील डॉक्टर तरुणी नीता पंडित गायकवाड (३४) ही जागीच ठार झाली. विश्रामबाग रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली.
........................................
.......................................










नीता पंडित गायकवाड (३४) असे तिचे नाव असून ती दंतचिकित्सक होती. नीता दररोज सकाळी विलिंग्डन महाविद्यालयाच्या मैदानावर फिरायला जायची. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती घरी परत येत होती; तेव्हा तिच्या हातात मोबाईल व कानाला हेडफोन होता. विश्रामबाग रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर त्या रूळ ओलांडत होत्या. त्यावेळी मिरजेहून पुण्याला निघालेल्या मालगाडीने तिला जोराची धडक दिली.
ती रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात असल्याचे रेल्वेचालकाने पाहिले होते. त्यामुळे त्याने हॉर्न वाजविला; पण नीता यांना हेडफोनमुळे ऐकू आले नाही. चालकाने ब्रेक मारून रेल्वे थांबविण्याचा प्रयत्न केला; पण वेगामुळे गाडी थांबविता आली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Headphone victim is the victim of a doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.