रिझर्व्ह बँकेने फेटाळला होता हेडलीचा अर्ज
By Admin | Updated: February 11, 2016 15:53 IST2016-02-11T15:53:20+5:302016-02-11T15:53:20+5:30
डेव्हिड कोलोमन हेडलीने व्यावसायिक खाते सुरु करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे अर्ज केला होता. मात्र रिझर्व्ह बँकेने त्याचा अर्ज फेटाळून लावला होता.

रिझर्व्ह बँकेने फेटाळला होता हेडलीचा अर्ज
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या कटाच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या डेव्हिड कोलोमन हेडलीने व्यावसायिक खाते सुरु करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे अर्ज केला होता. मात्र रिझर्व्ह बँकेने त्याचा अर्ज फेटाळून लावला होता.
हेडलीने २००७ मध्ये हा अर्ज केला होता. हेडलीने अमेरिकेतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे मुंबईच्या विशेष न्यायालयासमोर साक्ष देताना गुरुवारी ही माहिती दिली. दहशतवादासाठी मला लष्कर-ए-तयब्बा आणि आयएसआयकडून पैसा मिळाला होता. या पैशाचा त्याने गुप्तचरमाहिती गोळा करण्यासाठी आणि अन्य कामांसाठी वापर केला. या मिळालेल्या पैशातून तो दहशतवादी कारवाया झाकण्यासाठी व्यवसाय सुरु करणार होता.
दक्षिण मुंबईत ताडदेव भागात महिना १३५०० रुपये भाडयाने त्याने कार्यालयही घेतले होते. १२ ऑक्टोंबर २००६ मध्ये त्याने बिझनेस अकाऊंट सुरु करण्यासाठी आरबीआयकडे अर्ज केला होता. हेडलीचा शिकागोमधील व्हिसा सल्लागार रेमंड सँडर्सने त्याला आरबीआयकडे अर्ज करण्यासाठी मदत केली होती. पण एक जून २००७ रोजी रिझर्व्ह बँकेने त्याचा अर्ज नामंजूर केला.