मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी भरती झाला, पतीने डोळे उघडले अन् समोर बेपत्ता असलेली पत्नी दिसली, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 11:05 IST2025-02-13T11:00:36+5:302025-02-13T11:05:07+5:30
२२ दिवसापासून बेपत्ता असलेल्या पत्नीला रुग्णालयात पाहून पतीला धक्का बसला.

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी भरती झाला, पतीने डोळे उघडले अन् समोर बेपत्ता असलेली पत्नी दिसली, पण...
कधी आपल्या जवळची माणस आपल्याला सोडून गेली की खूप दु:ख होत असतं. त्या माणसांना शोधूनही ती परत मिळत नाहीत. पण, कधी कधी देवच पुन्हा एकदा आपल्या माणसांची भेट घडवून देत असतो. अशीच एक घटना समोर आली आहे. पत्नी गेल्या २२ दिवसापासून बेपत्ता होती. त्या पत्नीला पतीने खूप शोधलं होतं. पण, पत्नीचा पत्ता लागला नव्हता. यामुळे पतीने आता पत्नी पुन्हा भेटण्याची आशा सोडली होती.
ही घटना उत्तर प्रदेशमधील आहे. पतीला मोतीबिंदूचा त्रास होता, पती आणि पत्नी हे दोघेच राहत होते, पती वेल्डिंगचे काम करत होता. एक दिवस अचानक पत्नी बेपत्ता झाली, पतीने पत्नीचा शोध घेतला. पण, पत्नी सापडली नाही. यामुळे पतीला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पती मित्राच्या घरी राहायला गेला. त्यांना मोतीबिंदूचा त्रास असल्यामुळे मित्रांनी रुग्णालयात दाखल केले आणि मोतिबिंदूची शस्त्रक्रिया केली.
देशात भ्रष्टाचारात वाढ! १८० देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत कितव्या नंबरवर?
दुसऱ्या दिवश पतीने डोळे उघडताच बाजूला पत्नी दिसली, पत्नीला पाहून पतीला धक्काच बसला. हे पाहून पतीच्या डोळ्यात पाणी आले. पण ती महिला तिच्या पतीला ओळखू शकली नाही. कारण डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे महिलेची स्मृती गेली होती. आता पती रुग्णालयात पत्नीची काळजी घेतो, त्यामुळे महिलेची स्मरणशक्ती परत येऊ लागली आहे.
हे प्रकरण उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील आहे. शहरातील केवटा तलाव बस्ती येथील रहिवासी राकेश कुमार (५०) यांच्या पत्नी शांती देवी (४२) १३ जानेवारी रोजी अचानक घरातून बेपत्ता झाल्या होत्या. पतीने उन्नावपासून कानपूर, लखनौ आणि कन्नौजपर्यंत शोध घेतला. पण ती सापडली नाही. निराश होऊन पतीने १६ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. राकेश वेल्डिंगचे काम करतात. त्यांच्या घरी त्याची पत्नी शांती व्यतिरिक्त दुसरे कोणीही नाही.
डोळ्यात पाणीच आले....
७ फेब्रुवारी रोजी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर राकेश यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले. राकेश यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या शेजारी असलेल्या बेडवर दाखल असलेल्या एका महिला रुग्णाने पाणी मागितले. त्या महिलेचा आवाज ऐकून राकेश यांना धक्काच बसला. ज्यावेळी त्यांनी जवळ जाऊन पाहिले तेव्हा ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची हरवलेली पत्नी असल्याचे दिसले. हे पाहून पती राकेश भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण डोक्याला दुखापत असल्याने पत्नीला काहीही सांगता आले नाही आणि त्या महिलेने त्यांच्या पतीला ओळखले नाही.