शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 08:35 IST

Bike Stunt : ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील अथागड विभागात एका विवाहित जोडप्याचा बाईक स्टंट करतानाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

कुणाला कधी आणि कसली हौस पूर्ण करावी वाटेल काही सांगता येत नाही. मात्र, याच हौसेची त्यांना मोठी किंमत मोजावी लागते. अशीच एक घटना ओडिशामधून समोर आली आहे. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील अथागड विभागात एका विवाहित जोडप्याचा बाईक स्टंट करतानाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघे बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कडक कारवाई करत बाईक मालकाला १६,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

या जोडप्याचा बाईक स्टंट करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर ही संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून बाईक वेगाने चालवत होता. दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते आणि हा स्टंट सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकपणे केला जात होता. हा व्हिडीओ इंस्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्ससाठी शूट करण्यात आला आहे.      

पोलिसांनी कोणते चलान कापले?हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, एका जागरूक नागरिकाने या संबंधी माहिती ट्विटरवर शेअर केली. ओडिशा वाहतूक विभाग, डीजीपी, कटकचे जिल्हाधिकारी आणि प्रधान सचिव उषा पाधी यांना टॅग केले. तक्रारीत व्हिडीओसोबत बाईकचा नोंदणी क्रमांक देखील जोडण्यात आला होता, ज्यामुळे बाईक मालकाची ओळख पटवणे सोपे झाले. तपासादरम्यान, असे आढळून आले की बाईक मोहन साहू यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. आरटीओने मोटार वाहन कायद्याच्या विविध तरतुदींनुसार ₹ १६,००० चा चलन जारी केला.

कलम १८४: धोकादायक गाडी चालवणे: ₹५,०००

कलम १९०(२) – हवा आणि ध्वनी प्रदूषण निर्माण केल्याबद्दल १०,००० रुपये दंड

कलम १९४(ड) – हेल्मेट न घालणाऱ्या चालक आणि प्रवाशाला १,००० रुपये दंड

वाहतूक विभागाची कडक कारवाईसार्वजनिक रस्त्यांवर स्टंटबाजी करणे हा एक गंभीर गुन्हा आहे, जो केवळ स्वतःच्या जीवालाच नव्हे तर इतरांच्या जीवालाही धोका निर्माण करतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, परिवहन विभाग राज्यातील सर्व जिल्ह्यांवर कडक नजर ठेवून आहे आणि अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल. या घटनेने स्पष्ट संदेश दिला आहे की सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्ह्यूजसाठी नियमांचे उल्लंघन केल्यास मोठे नुकसान होऊ शकते.

टॅग्स :bikeबाईकStuntmanस्टंटमॅनCrime Newsगुन्हेगारीOdishaओदिशा