शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मेहुण्याच्या पत्नीशी अफेअर, रुसवा काढायला गेला पण ती ऐकेना, शेवटी उचललं टोकाचं पाऊल, अन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:07 IST

Utatr Pradesh Crime News: मेहुण्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवून १० वर्षांपासून एकत्र राहत असलेल्या इसमाने तिच्यासोबत झालेल्या किरकोळ वादानंतर जीवन संपल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील इटावा इथे घडली आहे.

मेहुण्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवून १० वर्षांपासून एकत्र राहत असलेल्या इसमाने तिच्यासोबत झालेल्या किरकोळ वादानंतर जीवन संपल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील इटावा इथे घडली आहे. अनिल असं या इसमाचं नाव असून, त्याचे त्याच्या मेहुण्याच्या पत्नीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. एवढंच नाही तर गेल्या १० वर्षांपासून ते एकत्र राहत होते. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी काही कारणांवरून नाराज होऊन सदर महिला सासरी निघून गेली होती. त्यानंतर अनिल हा तिची समजूत काढण्यासाठी तिच्या सासरी गेला. मात्र तिने त्याचं म्हणणं ऐकलं नाही. त्यामुळे संतापलेल्या अनिल याने कट्ट्याद्वारे आपल्या डोक्यात गोळी झाडून घेत जीवन संपवलं. मात्र आता ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे संपूर्ण प्रकरण बकेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हालुपूरा गावातील आहे. येथील ५० वर्षीय अनिल नावाच्या इसमाचे त्याच्या मेव्हण्याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांची कुणकूण लागल्यानंतर अनिल याच्या मेव्हण्याने पत्नीला घराबाहेर काढले होते. तेव्हापासून ती औरैया येथील तिच्या माहेरी राहत होती.

तिथे अनिल याचं येणं जाणं सुरू झालं होतं. तसेच अनिल हा काही काळानंतर तिच्यासोबत राहू लागला होता. अनिल याला तीन मुलं होती. त्यापैकी मोठ्या मुलीचं लग्न झाले आहे. एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर धाकट्या मुलाचंही लग्न झालेलं आहे. अनिल याच्या पत्नीचा दोन वर्षांपूर्वी जळून मृत्यू झाला होता. अनिल याच्या मेहुण्याच्या पत्नीलाही दोन मुलगे आणि एक मुलगी अशी तीन मुलं आहेत. त्यांचे विवाह झाले आहेत.

अनिल हा सुमारे १० वर्षांपासून या महिलेसोबत राहत होता. दोघांमध्ये दोन महिन्यांपूर्वी काही कारणावरून भांडण झालं होतं. त्यानंतर ही महिला पुन्हा सासरी राहायला गेली होती. त्यानंतर अनिल तिची समजूत काढून तिचा रुसवा दूर करण्यासाठी तिच्या सासरी गेला. मात्र तिने त्याच्यासोबत येण्यास नकार दिला. अनिल हा तिला मारहाण  करायचा असा आरोपही आता केला जात आहे. दरम्यान, या महिलेने अनिलसोबत येण्यास नकार दिल्यावर अनिल याने डोक्यावर कट्टा लावून गोळी झाडली आणि जीवन संपवलं.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशrelationshipरिलेशनशिप