हिवराबाजार.....
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:15+5:302015-01-29T23:17:15+5:30
हिवराबाजार

हिवराबाजार.....
ह वराबाजारस्थनिक गावात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जि. प. प्राथमिक शाळा व शांतिनिकेतन शाळेतर्फे विद्यार्थ्यांची गावात प्रभातफेरी काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच कुंदा नान्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच दुर्गा मंदिर परिसरात राजेश जयस्वाल, जुना बाजार चौक बालकराम गायधने, शांतिनिकेतन अध्ययन मंदिर येथे सुरेंद्र वाडीभस्मे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जि. प. शाळा व शांतिनिकेतन या दोन्ही शाळांच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शेख सुभान होते. यावेळी मुख्याध्यापक सिद्धार्थ कळमकर, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक अजय चव्हाण, बिसने, कडू, ढोमणे, कोहळे, भिवगडे, कळमकर, धुर्वे, महेश बम्हनोटे, जितेंद्र जयस्वाल, ग्रा. पं. सदस्य राजेंद्र बागडे, गणेश चौधरी, रमेश बम्हनोटे, जयश्री नंदेश्वर, उपसरपंच विमल कुमरे आदी उपस्थित होते. संचालन बिसने यांनी केले.