Hathras Case: भाजप खासदार पोहोचले बलात्कारी आरोपी असलेल्या तुरुंगात; म्हणे, चहा प्यायला गेलो होतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 06:41 IST2020-10-06T05:56:14+5:302020-10-06T06:41:40+5:30
Hathras Case: दलित विरुद्ध सवर्ण वादाला सुरुवात

Hathras Case: भाजप खासदार पोहोचले बलात्कारी आरोपी असलेल्या तुरुंगात; म्हणे, चहा प्यायला गेलो होतो
हाथरस : दलित तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या चौघांची भाजपचे स्थानिक खासदार राजवीर सिंह दिलेर यांनी भेट घेतल्याच्या वृत्ताने हे प्रकरण दडपण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
आपण आरोपींना भेटलो नाही, कारागृहासमोरून जाताना तिथे काही लोक भेटले. त्यांच्याशी मी बोलत असल्याचे कळताच जेलर बाहेर आले. त्यांनी मला चहाचा आग्रह केला, म्हणून मी आत गेलो. तिथे कोणाही आरोपीची भेट घेतली नाही, असा खुलासा खा. दिलेर यांनी केला आहे.
हाथरस हा अनुसूचित जातीसाठी राखीव लोकसभा मतदारसंघ असून, तेथून दिलेर निवडून आले आहेत. खा. दिलेर व त्यांच्या मुलीनेच आमच्या मुलांना या प्रकरणात मुद्दाम अडकवले, असे आरोपीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. आरोपी ठाकूर समाजाचे असून, तिथे ठाकूर व वाल्मिकी सामाजिक यांच्यात तेढ वाढत चालली आहे.