व्यक्तीचा नव्हे, दारुचा तिरस्कार करा भाग २
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:30+5:302015-02-15T22:36:30+5:30
दारू आणि व्यक्ती वेगळ्या आहेत. दारू हा आजार आहे. तो व्यक्तीचा दोष नसल्यामुळे त्याचा तिरस्कार करू नका हे शिकले. त्यावर मुलीला तुझे पप्पा चांगले आहेत. ते बोलत नाहीत. त्यांची दारू बोलते ही बाब तिच्या मनावर बिंबविली. सुभाषला ज्या हव्या त्या सुविधा उपलब्ध करून देऊन एकप्रकारे त्याचा आत्मविश्वास मीच कमी केला. परंतु दारू पिणाऱ्याला सहानुभूती दाखवू नका, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला. दारू पिणाऱ्यांची मुले टेन्शनमध्ये वाढतात, आई टेन्शनमध्ये असते. मुलांना घराबाहेर पडताना कमीपणा वाटतो. परंतु दारू आणि व्यक्ती वेगळी केल्यास मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. आपली मुलगी आर्याने वडिलांसोबत राहूनही चांगले शिक्षण घेतल्याचे उदाहरण त्यांनी दिले. त्या म्हणाल्या, मुलांवर जबरदस्ती न करता त्यांच्याशी संवाद साधून त्यांना घडवा. दारू न पिणाऱ्यांच्या घरातह

व्यक्तीचा नव्हे, दारुचा तिरस्कार करा भाग २
द रू आणि व्यक्ती वेगळ्या आहेत. दारू हा आजार आहे. तो व्यक्तीचा दोष नसल्यामुळे त्याचा तिरस्कार करू नका हे शिकले. त्यावर मुलीला तुझे पप्पा चांगले आहेत. ते बोलत नाहीत. त्यांची दारू बोलते ही बाब तिच्या मनावर बिंबविली. सुभाषला ज्या हव्या त्या सुविधा उपलब्ध करून देऊन एकप्रकारे त्याचा आत्मविश्वास मीच कमी केला. परंतु दारू पिणाऱ्याला सहानुभूती दाखवू नका, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला. दारू पिणाऱ्यांची मुले टेन्शनमध्ये वाढतात, आई टेन्शनमध्ये असते. मुलांना घराबाहेर पडताना कमीपणा वाटतो. परंतु दारू आणि व्यक्ती वेगळी केल्यास मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. आपली मुलगी आर्याने वडिलांसोबत राहूनही चांगले शिक्षण घेतल्याचे उदाहरण त्यांनी दिले. त्या म्हणाल्या, मुलांवर जबरदस्ती न करता त्यांच्याशी संवाद साधून त्यांना घडवा. दारू न पिणाऱ्यांच्या घरातही समस्या असतात याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून सर्वांना आपल्यातील दोष मान्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात अल्कोहोलिक ॲनानिमस संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात ३५ ठिकाणी दारू सोडविण्यासाठी शिबिरे घेतल्या जात असल्याची माहिती दिली. गुलमोहोर या सामाजिक संस्थेच्या सुजाता देव यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)..............दारूमुळेच घेता आला मला माझा शोधसाधना कुळकर्णी यांनी पतीच्या दारूकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता सकारात्मक दृष्टीने पाहून पतीच्या दारूमुळेच आपल्यातील दोष दूर झाल्याचे सांगितले. दारू हा आजार असल्याचे कळाल्यानंतर मी माझा संतापी स्वभाव, कतृर्त्वाची नशा, मुलीकडून अवाजवी अपेक्षा या आजारावर नियंत्रण मिळविल्याचे सांगून पतीच्या दारूमुळे मला माझा शोध घेता आल्याची कबुली दिली..............