शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

Sheetal Chaudhary: शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:13 IST

Model Sheetal Chaudhary Death: हरियाणामध्ये एका मॉडेलची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Haryanvi Model Sheetal Chaudhary: पंजाबमधील सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर कांचन कुमारी उर्फ ​​कमल कौर भाभी हत्या प्रकरण ताजे असतानाच हरियाणातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध हरियाणवी मॉडेल शीतल उर्फ ​​सिम्मी चौधरी हिचा गळा चिरून खून करण्यात आली आहे. हत्येनंतर शितलचा मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आला. दोन दिवसांपूर्वी एका अल्बमच्या शूटिंगसाठी पानिपत येथील तिच्या घरातून शितल निघाली होती. मात्र त्यानंतर पोलिसांना एक मृतदेह मिळाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चौकशी केली असता हा मृतदेह शितलचा असल्याचे समोर आलं.

हरियाणातल्या संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या शीतल चौधरीची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. खांडा गावाजवळील रिलायन्स कालव्यातून शीतलचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. शीतलच्या हातावर आणि छातीवर असलेल्या टॅटूवरून तिच्या मृतदेहाची ओळख पटली.

"आम्हाला कालव्यात एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. मृतदेहाची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेच्या दरम्यान, शीतल नावाच्या महिलेची पानिपतमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याचे आढळून आले. पोलिस पुढील कारवाई करत आहेत," असं सोनीपतचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अजित सिंह यांनी सांगितले.

शनिवारी शीतलने एक व्हिडिओ कॉल केला होता ज्यामध्ये तिने तिचा प्रियकर मारहाण करत असल्याचे सांगितले होते, असं शीतलची बहीण नेहाने सांगितले.तो तिला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे असं शीतल म्हणाली होती. यानंतर कॉल कट झाला. याआधी रविवारी सकाळी शीतलच्या प्रियकराची गाडीही पानिपतमधील एका कालव्यात पडलेली आढळली होती. लोकांनी ती गाडी तिथून बाहेर काढली. मात्र शीतल त्या गाडीत नव्हती. "शीतल माझ्यासोबत राहत होती. ती एका हरियाणवी अल्बममध्ये मॉडेल म्हणून काम करायची. ती शनिवारी अहर गावात शूटिंगसाठी गेली होती. तिथून ती परत आली नाही. मी तिच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण कोणतीही माहिती मिळाली नाही," असेही नेहाने सांगितले.

दरम्यान, शीतलने सुमारे ६ महिन्यांपूर्वी शूटिंग सुरू केले होते. तिने अनेक गाण्यांसाठी शूटिंग केले आहे. ती कर्नालमधील मॉडेल टाउनमध्ये असलेल्या हॉटेल सुकूनमध्ये काम करायची, ज्याचा मालक सुनील होता. हॉटेलमध्ये काम करताना सुनीलची शीतलशी मैत्री झाली होती. यानंतर सुनील तिच्याशी लग्न करण्याबद्दल बोलू लागला. मात्र सुनीलचे लग्न झालं असून त्याला २ मुले आहेत हे शीतलला कळलं. यानंतर शीतलने त्याला नकार दिला आणि तिथे काम करणेही बंद केले. मात्र सुनीलने तिचा पाठलाग करणे सोडले नाही. शनिवारी रात्री १.३० वाजता शीतलने नेहाला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल केला होता. यादरम्यान तिने सांगितले की सुनीलने तिथे येऊन मला मारहाण केली. 

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूCelebrityसेलिब्रिटी